मला कधीही मंत्री बनायचे नव्हते; Suresh Gopi यांनी अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी

91
मला कधीही मंत्री बनायचे नव्हते; Suresh Gopi यांनी अमित शहांकडे केली 'ही' मागणी

राजकारण जोरात सुरु राहण्यासाठी नेते वाट्टेल ते करतात. अगदी पक्षात बदल करण्यापासून तर विचारधारेसोबत देखील तडजोड करण्याची तयारी असते. मात्र केंद्रात मंत्रिपदाची अचानक लॉटरी लागल्यानंतर देखील आपल्याला चित्रपट करायचा आहे. अभिनय करण्यासाठी वेळ हवा आहे, अशी मागणी भाजपाचे खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी थेट पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याकडे केली आहे. खासदार सुरेश गोपी हे अभिनेते आहेत. गोपी म्हणाले की, मला कधीही मंत्री बनायचे नव्हते, तसेच मंत्रिपद नको होते. मला मंत्री करण्याच्या त्यांच्या (नेत्यांच्या) निर्णयासमोर मी मान झुकवली. मला ते त्रिशूरच्या लोकांसाठी पद देत असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांचा निर्णय मान्य केला. मी आताही त्यांचे ऐकतो आणि पुढेही ऐकत राहीन. पण चित्रपटांशिवाय मी मरून जाईन.

(हेही वाचा – Namo Shetkari Mahasanman Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! चौथा आणि पाचवा हफ्ता ‘या’ तारखेला मिळण्याची शक्यता )

केंद्रात मंत्रिपद मिळावे, यासाठी पक्ष प्रमुखाकडे वशिलेबाजी लावण्यात येते. तर गोपी मात्र याला अपवाद आहेत. त्यांना अगदी अचानक मंत्रिपद मिळाल्यामुळे सुरेश गोपी यांना मात्र हे पदच नकोसे झाले आहे. त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मोकळीक हवी आहे. केरळमधून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत पोहचलेले ते पहिले खासदार. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्यांना बक्षिसी देत केंद्रीय राज्यमंत्री केले. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली. परिणामी, चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंधने आल्याने ते व्याकूळ झाले आहे.

(हेही वाचा – Assembly Election : विधानसभेचा चेहरा उद्धव ठाकरेच, शरद पवारांनी दिले संकेत)

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे चित्रपटात काम करण्यासाठी परवानगी मागायला गेल्याची कबुलीही सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी दिली. पण शाहांनी विनंतीचा तो कागद पाहायलाही नाही, असे खुद्द सुरेश गोपींनीच सांगितले. बुधवारी केरळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्रिपदावरून आपल्याला हटवले तर मी वाचलो असे समजेन, असे विधान केले आहे. सुरेश गोपी म्हणाले, ओट्टाकोम्बन या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. पण अद्याप मिळालेली नाही. पण असे असले तरी मी ६ सप्टेंबरपासून शूटिंग सुरू करणार आहे. स्क्रिप्ट वाचल्यानंतर जवळपास २० ते २२ चित्रपटांमध्ये काम करण्याची सहमती दर्शवली आहे. अमित शाहांकडे परवानगी मागायला गेल्यानंतर त्यांनी किती चित्रपट आहेत, असे विचारले. मी २२ चित्रपट असल्याचे सांगताच त्यांनी विनंतीपत्र बाजूला ठेवले. पण परवानगी मिळेल, असेही ते म्हणाल्याचे गोपींनी सांगितले.

(हेही वाचा – MPSC परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; आंदोलक विद्यार्थ्यांना दिलासा)

… आणि सेट झाले मंत्र्याचे कार्यालय

शूटिंगवेळी मंत्रालयाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी मत्रालयातील तीन-चार अधिकाऱ्यांना सोबत आणणार असल्याचेही सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी सांगितले. हे अधिकारी मला मंत्रिपदाची कर्तव्य पार पाडण्याची मदत करतील. त्यासाठी चित्रपटाच्या सेटवर विशेष व्यवस्था केली जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.