राज्यसभेत भाजपाप्रणीत NDA पोहोचली बहुमताच्या जवळ

सद्यःस्थितीत राज्यसभेचे २३७ सदस्य आहेत. त्यानुसार बहुमतासाठी ११९ सदस्य असणे आवश्यक आहे.

136

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांपैकी भाजपाच्या ८, तर भाजपाच्या मित्रपक्षांच्या ३  सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) सदस्यांची संख्या ११२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या संख्येसह राज्यसभेत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) बहुमताच्या जवळ पोचली आहे.

भाजपाची खासदार संख्या झाली ९५ 

८ सदस्य निवडून आल्यानंतर आता राज्यसभेत भाजपाच्या सदस्यांची संख्या ९५ झाली आहे, तर विरोधकांची एकूण संख्या ८५ झाली आहे. राज्यसभेच्या एकूण २४५ जागा आहेत. त्यांपैकी ८ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये जम्मू काश्मीरमधील ४ आणि राष्ट्रपती नियुक्त ४ जागांचा समावेश आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत राज्यसभेचे २३७ सदस्य आहेत. त्यानुसार बहुमतासाठी ११९ सदस्य असणे आवश्यक आहे. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) सदस्यसंख्या ११२ इतकी झाली आहे.

(हेही वाचा काँग्रेसच्या सर्वेमध्ये Shiv Sena UBT तिसऱ्या स्थानावर; याचा नेमका अर्थ काय?)

निवडून आलेल्या ११ सदस्यांमध्ये कुणाचा समावेश?

भाजपाचे जे ८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, त्यांमध्ये आसाममधून रामेश्‍वर तेली आणि मिशन रंजन दास, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरियाणातून किरण चौधरी, मध्यप्रदेशातून जॉर्ज कुरीयन, महाराष्ट्रातून धर्यैशील पाटील, ओडिशातून ममता मोहंता आणि राजस्थानमधून रवनीत सिंह बिट्टू यांच्या समावेश आहे. याखेरीज भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नितीन पाटील, तसेच बिहारमधील राष्ट्रीय लोकमंचचे उपेंद्र कुशवाह हे बिनविरोध निवडून आले आहेत. यासह काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी हेही राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आहेत. त्रिपुरातून राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपाचे राजीव भट्टाचार्जी निवडून येण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.