सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना दिली समोरासमोर ऑफर; म्हणाले…

4

विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आमने-सामने आले, तेव्हा युती तोडल्यावरून मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. मात्र त्याच वेळी बोलताना मुनगंटीवार यांनी ‘उद्धवजी पुन्हा एकदा शांततेने विचार करा, झाड वाढवायचा विचार करा’ असे म्हणत ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे युतीची ऑफरच दिली.

काय म्हणाले मुनगंटीवार?

उद्धवजी मी भेटून तुम्हाला स्वतः सांगायचो फळ येतील पण तुम्ही झाडाशी नातं तोडले. तुम्ही झाडाशी नातं तोडले त्याला आता मी काय करणार? मी येवून व्यक्तीगत सांगायचो की या झाडाला कोणते खत पाहिजे, मात्र तुम्ही ते खत न टाकता दुसरेच खत टाकले. मी एकदा नाही तीनदा विनंती केली. आजही वेळ गेलेली नाही शांततेत विचार करा, झाड वाढवायचा विचार करा, असे मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटले.

(हेही वाचा वीर सावरकरांचा अवमान करणा-या राहुल गांधींना जोडे मारले; पण ‘शिदोरी’वर कारवाई कधी?)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?      

तुम्ही खताऐवजी निर्माल्य टाकल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देखील मुनगंटीवार यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. गेल्या १८ वर्षांपासून ते घासले, पुसलेले भाषण होते, असा टोमणाही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.