Bitcoin Scam : बिटकॉईन घोटाळा प्रकरणी भाजपाचा काँग्रेसवर वार

93
Bitcoin Scam : बिटकॉईन घोटाळा प्रकरणी भाजपाचा काँग्रेसवर वार

खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका करीत भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी बिटकॉईन घोटाळा प्रकरणी गांधी कुटुंबियांना देखील चांगलेच धारेवर धरले. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी बिटकॉईनशी संबधित एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यामुळे भाजपाच्या हातात महाविकास आघाडीच्या विरोधात चांगलीच संधी मिळाली. भाजपाने तथाकथित बिटकॉईन घोटाळ्याच्या माध्यमातून बुधवारी (२० नोव्हेंबर) कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याशिवाय कॉंग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेही त्यात सामील असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी केला. (Bitcoin Scam)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईत सुमारे ७ हजार स्वयंसेवकांनी लावला मतदानाला हातभार)

भाजपा महासचिव विनोद तावडे यांच्याशी संबधित ‘कॅश फॉर व्होट’ प्रकरणानंतर भाजपाने आक्रामक भूमिका घेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर (एसपी) आपली तोफ डागली. भाजपा प्रवक्ते आणि खासदार डॉ. संबित पात्रा यांनी पक्षाच्या मुख्यालयात तडकाफडकी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तथाकथित बिटकॉईन घोटाळ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशिवाय गांधी कुटुंबसुद्धा सामील असल्याचा आरोप पात्रा यांनी केला. (Bitcoin Scam)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मतदानावेळी कुठे राडा तर कुठे पैशांवरून गोंधळ)

यावेळी बोलताना पात्रा म्हणाले की, सुप्रिया सुळे यांचे असे चार ऑडिओ आहेत. ऑडिओतील आवाज आपला नाही असे त्या म्हणत असल्या तरी त्यांच्या बंधूंनी तो आवाज सुळे यांचाच असल्याचे म्हटले आहे. त्या कुणाला तरी निर्देश देत असल्याचे ऑडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. केवळ सुप्रिया सुळेच नव्हे तर नाना पटोले हे सुद्धा आयुक्तांना निर्देश देताना दिसत आहेत, असे पात्रा म्हणाले. संबित पात्रा पुढे म्हणाले की, सिग्नल ॲपच्या चॅट बॉक्समधील चॅटवरून असे दिसून येते की, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्याशिवाय आणखी काही मोठे खेळाडू आहेत. (Bitcoin Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.