Delhi High Court : पंतप्रधान मोदींची बदनामी केल्याप्रकरणी BBC विरोधात समन्स जारी

दोन भागांच्या माहितीपटामुळे न्यायव्यवस्थेसह देशाची बदनामी झाली आहे, असा युक्तिवाद एनजीओतर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला.

26

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील डॉक्यूमेंट्रीमुळे न्यायव्यवस्था आणि पंतप्रधानांसह भारताच्या प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला (BBC) मानहानीच्या दाव्यात समन्स बजावले. जस्टिस ऑन ट्रायल या गुजरातस्थित एनजीओने दाखल केलेल्या दाव्यात न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी समन्स जारी केले आणि सप्टेंबरमध्ये सुनावणीसाठी सूचीबद्ध केले. न्यायालयाने म्हटले की, “असा युक्तिवाद करण्यात आला आहे की डॉक्युमेंट्री देश आणि न्यायपालिका आणि पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेवर बदनामीकारक आरोप करते. प्रतिवादींना नोटीस जारी करा.”

दोन भागांच्या माहितीपटामुळे न्यायव्यवस्थेसह देशाची बदनामी झाली आहे, असा युक्तिवाद एनजीओतर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित वादग्रस्त माहितीपट किंवा इतर कोणताही कंटेंट प्रकाशित केल्याबद्दल भाजप नेते बिनय कुमार सिंह यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात खालच्या न्यायालयाने अलीकडेच बीबीसी, विकिमीडिया फाऊंडेशन आणि इंटरनेट आर्काइव्हला समन्स बजावले होते. त्याचे प्रसारण थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.

(हेही वाचा Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय कायम; पुढील सुनावणी ८ जून रोजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.