Bangladesh Interim Government : हिंदू नरसंहार सुरू असलेल्या बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान डॉ. मोहम्मद युनूस आहेत शरद पवारांचे मित्र!

397
Bangladesh Interim Government : बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान शरद पवार यांचे मित्र!
  • सुजित महामुलकर

शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते आणि दोन दिवसांपूर्वीच हिंदू नरसंहार सुरू असलेल्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेले डॉ. मोहम्मद युनूस हे राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांचे मित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पवार यांच्या हस्ते डॉ. युनूस यांना १६ वर्षांपूर्वी पुण्यात एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Bangladesh Interim Government)

पर्सन ऑफ द इयर पुरस्कार

ग्रामीण बँकेच्या माध्यमातून बांग्लादेशांत आर्थिक क्रांती घडवणारे, ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि CMD प्रा. मोहम्मद यूनुस यांना २००६ मध्ये शांततेचा सर्वोच्च नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तर शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या मालकीच्या ‘सकाळ’ या वृत्तपत्र समूहातर्फे देण्यात येणारा ‘पर्सन ऑफ द इयर पुरस्कार २००७’ या पुरस्काराने प्रा. युनूस यांना नोव्हेंबर २००७ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दहा लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. (Bangladesh Interim Government)

(हेही वाचा – Haryana School: हरियाणातील शाळांमध्ये आता ‘Good Morning’ ऐवजी म्हणावे लागेल ‘जय हिंद’)

डॉ. युनूस यांनी व्यक्त केल्या भावना

यानिमित्त ‘सकाळ’ने डॉ. युनूस यांच्या कार्याची माहिती देणारी गौरव विशेष पुरवणी देखील प्रकाशित केली होती. डॉ. युनूस यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत भारतासह विविध देशात अल्पबचत गटही सुरू झाले. डॉ. युनूस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपण या सन्मानाने भारावून गेल्याचे म्हटले होते. ते म्हणाले, की मला पुरस्कार मिळत आहे, यापेक्षा दारिद्रय निर्मूलनाच्या ज्या कल्पना मी राबवित आहे, त्यांना जो मोठा पाठिंबा मिळत आहे, त्याचा मला आनंद होत आहे. ‘सकाळ’ने माझ्या कार्यावर केवळ विश्वासच ठेवला नाही, तर त्याला पाठबळही दर्शविले आहे. त्यातूनच आम्हाला आमचे कार्य पुढे नेण्यास ऊर्जा प्राप्त होणार आहे. (Bangladesh Interim Government)

या सोहळ्यानंतर डॉ. युनूस आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी अनौपचारिक गप्पाही मारल्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आर्थिक विषयावर मार्गदर्शन केले. (Bangladesh Interim Government)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.