Ban Ind vs Ban Test Series : पैशासाठी बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळत राहणे हा देशाचा अपमान; रणजित सावरकर यांची भूमिका

Ban Ind vs Ban Test Series : बांगलादेशमध्ये अलीकडे हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने ही मालिका खेळू नये असा काहींचा सूर आहे. 

107
Ban Ind vs Ban Test Series : पैशासाठी बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळत राहणे हा देशाचा अपमान; रणजित सावरकर यांची भूमिका
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि बांगलादेशच्या क्रिकेट संघांदरम्यान सध्या सुरू असलेल्या मालिकेला अनेक हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. दुसऱ्या कानपूर कसोटीपूर्वी तर तिथे हिंदू जनजागरण समितीने या कसोटी विरोधात मोर्चाही काढला होता. त्यामुळे या सामन्यासाठी ग्रीन पार्क मैदानाभोवती कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. बांगलादेशमधील राजकीय अस्थिरता आणि तिथे झालेल्या आंदोलनांदरम्यान तिथल्या हिंदूंवर होत असलेले हल्ले आणि अत्याचार यामुळे या संघटनांचा या मालिकेला विरोध आहे. बांगलादेशात हिंदूंवर अन्याय होत असताना त्यांना देशात बोलावून त्यांच्याबरोबर कसोटी मालिका खेळू नये, अशी या संघटनांची भूमिका आहे. (Ban Ind vs Ban Test Series)

हिंदुस्थान पोस्टचाही या मालिकेला विरोधच आहे. या मालिकेचं कुठल्याही प्रकारे वार्तांकन न करण्याचा निर्णय संपादकीय मंडळाने आधीच जाहीर केला आहे. पण, त्याचवेळी बांगलादेशच्या सरकारची हिंदूविरोधी भूमिका दिसत असताना ही मालिका बीसीसीआयने होऊ का दिली, असा प्रश्न आता विचारला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनीही आपली भूमिका वेळोवेळी मांडली आहे. ‘बांगलादेशमध्ये हिंदूंवर उघड उघड अत्याचार होत आहेत. तिथे हिंदूंची घरं जाळली जात आहेत. असं असताना केवळ पैसा महत्त्वाचा म्हणून त्यांच्याबरोबर खेळत राहणं हा देशाचा आणि देशवासीयांचा अपमान आहे. बीसीसीआयने ही मालिका ताबडतोब थांबवायला हवी,’ असं रणजित सावरकर यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितलं. (Ban Ind vs Ban Test Series)

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ महिलेची पटली ओळख )

भारतीय संघ सध्या आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया मागोमाग दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याचा संघाचा प्रयत्न आहे. बांगलादेश विरुद्धची मालिका हा या अजिंक्यपद कार्यक्रमाचाच भाग आहे. पण, बांगलादेशबरोबर जिंकून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत स्थान भक्कम करण्यापेक्षा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली कामगिरी करून भारताने पराक्रम गाजवावा अशी भूमिका रणजित सावरकर यांनी मांडली आहे. (Ban Ind vs Ban Test Series)

‘बांगलादेशला हरवून आपला पहिला क्रमांक सुनिश्चित करायचा हे चुकीचं कारण आहे. इतकंच नाही तर तुलनेनं दुबळ्या संघाला हरवून अव्वल स्थान मिरवणं. त्यासाठी मालिकेचा घाट घालणं हा षंढपणा आहे. त्यापेक्षा ही मालिका देशाभिमानासाठी सोडून देऊन ऑस्ट्रेलियाला हरवण्याची जिद्द भारतीय संघाने बाळगली पाहिजे. पैशाचा विचार करून देशाभिमान क्रिकेट संघाने मागे ठेवू नये,’ असं सावरकर यांनी बोलून दाखवलं. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही ही मालिका होऊ नये अशीच भूमिका मांडली होती. तर सोशल मीडियावरही ‘बॅन इंडिया – बांगलादेश क्रिकेट,’ असा हॅशटॅग फिरत आहे. (Ban Ind vs Ban Test Series)

(हेही वाचा – Crime : बांगलादेशी पॉर्न स्टार बन्ना शेखला बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी अटक)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.