Badlapur School Case: विरोधक संवेदनशील विषयाचे राजकारण करत आहेत – मुख्यमंत्री शिंदे

100
Badlapur School Case: विरोधक संवेदनशील विषयाचे राजकारण करत आहेत - मुख्यमंत्री शिंदे
Badlapur School Case: विरोधक संवेदनशील विषयाचे राजकारण करत आहेत - मुख्यमंत्री शिंदे

डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येने कोलकाता पेटलेले असतानाच, बदलापूरसह महाराष्ट्राही भीषण घटनेने हादरला आहे. विकृतीच्या पलीकडचे असे वर्तन जिथे नराधम करत असेल, तिथे आपल्याला माणूस असण्याची लाज वाटू लागते. दरम्यान, बदलापूरमधील आदर्श विद्यालय (Adarsh Vidyalay, Badlapur) शाळेत शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवर सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर, नागरिकांनी मंगळवारी (२० ऑगस्ट) जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी सुरुवातीला शाळेसमोर आंदोलन केले. यानंतर आंदोलक थेट बदलापूर रेल्वे स्थानकात पोहोचले आणि त्यांनी ‘रेल रोको’ (Badlapur Rail Roko) केला. जवळपास ८ ते ९ तास चाललेल्या या आंदोलनामुळे सायंकाळी साधारणपणे ६ वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प होती. यामुळे प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झाले. याच आंदोलन संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मंगळवार (२० ऑगस्ट) रोजी केलेले आंदोलन हे विरोधी राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. (Badlapur School Case)

(हेही वाचा – ‘The Diary of West Bengal’ चित्रपटाने मांडले पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या भीषण दुःस्थितीचे वास्तव)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छोट्या बच्चूसोबत घडलेल्या घटनेचे राजकारण करता, खरे तर ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी, शरम वाटायला हवी. विरोधकांना माझे केवळ एवढेच सांगणे आहे की, ‘मुख्यमत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Ladki badhin Yojana) योजनेमुळे जो काही पोटशूळ उठला आहे, तो कालच्या आंदोलनातून दिसला” (Badlapur School Case)

…आणि गाड्या भरून आंदोलक तिथे आले

“मी हेही सांगतो की गाड्या भरून-भरून नागरिक तेथे आंदोलन करण्यासाठी येत होते. हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. जे आले होते, ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. अशी आंदोलन असतात का? की, ताबडतोब बोर्ड छापून आणतात. म्हणजे ‘लाडक्या बहिणीचे पैसे नको, मुलगी सुरक्षित पाहिजे’, ‘लाडकी बहीण नको, पण सुरक्षित बहीण पाहिजे’. या राज्यातील बहिणींना सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि यात आरोपीवर कठोर कारवाई करता येईल, ते सरकार करेल. कुणालाही सोडणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही. यात जे-जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. (Badlapur School Case)

हेही पाहा –

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.