Baba Siddique Murder : मागील नऊ महिन्यांत राज्यात झाल्या चार राजकीय नेत्यांच्या हत्या

वाय दर्जाचे संरक्षण असूनही बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना पंधरा दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते.

246

शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या नऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder) यांची गोळीबार करुन हत्या करण्यात आली. वाय दर्जाचे संरक्षण असूनही बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना पंधरा दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. यानंतर निर्मलनगर खेरवाडीत त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांपैकी एक हरियाणाचा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे.

(हेही वाचा Baba Siddique हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली; समोर आले पुणे कनेक्शन)

7 फेब्रुवारी 2024 रोजी चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. महेंद्र मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

mahendra

9 फेब्रुवारी 2024 रोजी फेसबुक लाईव्ह करत शिवसेना उबाठाचे अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा उर्फ ‘मॉरिस भाई’ याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली नंतर आत्महत्या केली.

abhishek 1

4 ऑक्टोबर 2024 रोजी भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या करण्यात आली होती.

sachin kurmi

सचिन कुर्मा यांच्यावर भायखळामधील म्हाडा कॉलनीत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.