Azad Maidan Riot : तपासातील कुचराईमुळेच दंगलखोर मुसलमानांची हिंमत वाढली

मुसलमानांनी दंगल केल्यावर त्याला राजकीय हस्तक्षेपामुळे कसे पाठीशी घातले जाते. तपासात ढिलाई कशी केली जाते? दंगलीला कारणीभूत नेत्यांना कसे सुरक्षित केले जाते? आणि शेवटी ज्या दंगलखोर मुसलमानांना पकडलेले असते त्यांना मोकाट कसे सोडले जाते? हे सगळे जर जाणून घ्यायचे असेल तर आझाद मैदान दंगलीचा अभ्यास करावा.

23

आझाद मैदान दंगल आणि त्याचा तपास हे पोलिसांच्या तपासातील कमालीच्या अनास्थेचे उत्तम उदाहरण आहे. यावर्षीच्या राम नवमीच्या दिवशी छत्रपती संभाजी नगर आणि मुंबईत मालवणी येथे मुसलमानांनी दंगली केल्या. या दंगलीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी १३ मे २०२३ रोजी अकोला येथे दंगल झाली, तर १४ मे २०२३ रोजी शेवगाव येथे दंगल झाली. या दंगलीत दंगलखोर मुसलमानांनी दगडफेक केली, पोलिसांच्या गाड्या फोडल्या, खासगी वाहने जाळली, दुकाने फोडली. दंगलखोर मुसलमानांना जोवर पकडणार नाही, तोवर दुकाने बंद ठेवणार असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. जर आझाद मैदान दंगलीची सखोल चौकशी झाली असती, दंगलखोरांवर दोषरोप निश्चित करून त्यांना गजाआड केले असते, त्यांच्याकडून दंगलीत केलेल्या नुकसानीची भरपाई केली असती, तर राम नवमीच्या दिवशी म्हणा किंवा काल-परवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी मुसलमानांनी दंगल करण्याची हिमंत दाखवली नसती.

तर दंगली थांबल्या असत्या… 

मुसलमानांनी दंगल केल्यावर त्याला राजकीय हस्तक्षेपामुळे कसे पाठीशी घातले जाते. तपासात ढिलाई कशी केली जाते? दंगलीला कारणीभूत नेत्यांना कसे सुरक्षित केले जाते? आणि शेवटी ज्या दंगलखोर मुसलमानांना पकडलेले असते त्यांना मोकाट कसे सोडले जाते? हे सगळे जर जाणून घ्यायचे असेल तर आझाद मैदान दंगलीचा अभ्यास करावा. सध्या हिंदूंच्या देवतांचे उत्सव, हिंदूच्या आदर्श पुरुषांच्या जयंतीच्या दिवशी जाणीवपूर्वक मुसलमान दंगली घडवत आहेत. त्यामुळे आझाद मैदान दंगलीचा अभ्यास झालाच पाहिजे. या दंगलीच्या तपासात कुठे कुठे पोलिसांनी कुचराई केली याचा तपशील पाहूया. जर आझाद मैदानाच्या दंगलीचा तपास करून दंगलखोर मुसलमानांना शिक्षा झाली असती तर दंगली थांबल्या असत्या.

दंगल पूर्वनियोजित होती

या दंगलीच्या प्रथम दर्शनी अहवालात अर्थात एफआयआरमधील नोंदीनुसार मौलाना गुलाम अब्दुल कादरी यांचे प्रक्षोभक भाषण सुरू असताना बसलेल्या लोकांपैकी तीन हजारांचा जमाव बाहेर आला, तसेच त्याच वेळेला सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या दिशेकडून मोर्चासाठी येत असलेल्या सुमारे हजार मुसलमानांच्या जमावाने देखील आरडाओरडा आणि शिवीगाळ करत घोषणा देणे सुरू केले. या एक हजार लोकांपैकी बहुतांश लोकांकडे शस्त्रे व बाटल्यांमधून आणलेले ज्वालाग्राही द्रव पदार्थ होते. याचाच अर्थ हा जमाव पूर्व नियोजनाने आला होता. रझा अकॅडेमीकडून मुसलमान येणार होते, ही बाब स्पष्ट झाली होती. या पोलीस तक्रारीत पोलीस अधिकारी असेही सांगतात की, रिजवान खान आणि माजी पोलीस अधिकारी समशेर खान पठाण यांना कार्यक्रमाच्या आधी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सूचनाही दिल्या होत्या, परंतु समशेर खान पठाण हे आरोपी म्हणून दिसत नाहीत.

(हेही वाचा The Kerala Story : चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांमध्ये वाद; शो बंद करण्याची मागणी)

‘इनको दबा दो छोडना मत’, महिला पोलिसांना घेरून दंगलखोरांच्या घोषणा  

पोलीस तक्रारीनुसार दंगल करणाऱ्यांमध्ये चार हजार मुसलमानांचा जमाव होता, मात्र केवळ ५९ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. महिला पोलिसांचे जबाब अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, त्यांचा विनयभंग कसा केला. त्यांचा शर्ट कसा खेचला. युनिफॉर्मचा बेल्ट पाठीमागून खेचून दंगलखोरांनी महिला पोलिसांना पाठीमागून कसे ओढले व त्यांच्या कमरेला कसा स्पर्श केला, महिला पोलिसांच्या पॅन्टचे बटण कसे तुटले, त्यांचे शर्ट कसे ओढले आणि महिला पोलिसांना लाजिरवाणे कसे वाटले, महिला पोलिसांशी जमावाने मुद्दाम धक्काबुक्की कशी केली, महिला पोलिसांना मैदानातील भिंतीकडे जमावाने कसे रेटले, त्यांच्या मांड्यांना कसा स्पर्श केला, त्यामुळे महिला पोलिस शरमेने दुःखी झाल्या. अशा प्रकारे महिला पोलिसांचा विनयभंग झाला, हे या महिला पोलीस सांगतात. ‘इनको दबा दो छोडना मत’, असे जमाव सांगत होता.

आरोपींमध्ये नेत्यांची नावे वगळली

या दंगलीत पोलीस, मीडिया आणि खासगी अशी १७ वाहने जाळली. न्यायालयाने या दंगलीत झालेले नुकसान दंगलखोर मुसलमानांकडून वसूल करण्याचा आदेश दिला. मात्र दंगलखोर हजारो मुसलमानांपैकी केवळ साठ जणांकडून दंगलीची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले. या आरोपींमध्ये माजी पोलीस अधिकारी समशेर खान पठाण, रझा अकादमी, मदिना तुला फाउंडेशन या संघटनांची नावे नाहीत. जे मौलवी आझाद मैदानात व्यासपीठावर होते, त्यांचीही नावे या आरोपींमध्ये नाहीत. केवळ मौलाना नियम तुला रहमतुल्ला नुरी हे एकच नाव त्यात दिसते. बाकीचे या दंगलीसाठी जबाबदार नव्हते का? जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत अभ्यास का केला नाही?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.