अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या चाकू हल्ला प्रकरणी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी बांगलादेशी घुसखोरांवरदेखील (Bangladeshi Infiltrators) भाष्य केले आहे. अयोध्या येथील राम मंदिर उभारणीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित आळंदी आणि निगडी येथील कार्यक्रमांना बुधवारी (दि. 22) नितेश राणे यांनी हजेरी लावली. यावेळी भाषण करताना नितेश राणे यांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणी सवाल उपस्थित केले. (Nitesh Rane)
हेही वाचा-Temple Management : पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे देणार ; ‘असा’ असेल अभ्यासक्रम
नितेश राणे म्हणाले, “बघा हे घुसखोर बांगलादेशी मुंबईत काय करत आहेत. त्यांची हिम्मत बघा. पूर्वी ते रस्त्यावर राहायचे, आता ते लोकांच्या घरात घुसत आहेत. सैफ अली खानच्या घरातही त्यांनी प्रवेश केला. त्याच्यावर चाकूने हल्ला झाला हे खरे होते की अभिनय होता? सैफ रुग्णालयातून निघाल्यावर कसा टुन-टुन उड्या मारत घरात जात होता.” (Nitesh Rane)
हेही वाचा-Torres Scam प्रकरणात मुंबई, जयपूरसह ईडीची १० ठिकाणी छापेमारी
नितेश राणे पुढे म्हणाले की, सेक्युलर हा शब्द आपल्या संविधानात नाही. सेक्युलर शब्द हा फक्त काँग्रेसची नाटकं आहेत. हे हिंदू राष्ट्र आहे, इथे फक्त आता हिंदूंचे हित पाहिले जाणार आहे. आगामी काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही. सरकार जे चालवत आहेत, त्यांचं रक्त लाल नाही, तर त्यांचं रक्त हे भगवं आहे. आम्ही या सरकारमध्ये नाही मिरवणार तर मग कुठे मिरवणार? या सरकारमध्ये आपली कॉलर टाईट करा. थडगे वगैरे जे काही बांधून ठेवले आहे, पीर-बाबा वगैरे यांना या राज्यामध्ये विचारू नका. त्यांना बाहेर ढकलून टाका. मोहम्मद पैगंबर यांना मानणारेच मुस्लीम पीर बाबा वगेरे मानत नाहीत. मैं इस बाप का हू की उस बाप का? यातच यांचा गोंधळ सुरू आहे. असे राणेंनी म्हटले. (Nitesh Rane)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community