Assembly Elections : पवार-ठाकरेंना,फडणवीस-शिंदे टाकणार गुगली…..?

140
Assembly Elections : पवार-ठाकरेंना,फडणवीस-शिंदे टाकणार गुगली.....?
Assembly Elections : पवार-ठाकरेंना,फडणवीस-शिंदे टाकणार गुगली.....?

आगामी विधानसभा निवडणूकीत (Assembly Elections) एकाचवेळी उध्दव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी तोडीसतोड मुकाबला करण्यासाठी सध्या सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवारांना स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी थेट केंद्रिय पातळीवरून भाजपाच्या शिरसर्स्थ नेतृत्वानेच सुत्रे हलविण्यास सुरूवात केल्याची अत्यंत गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

यामागे दोन्ही पक्षातील खालपासून वरपर्यंतच्या कार्यकर्त्यांत नाराजीही राहणार नाही व अजित पवारांनाही जास्तीत जास्त जागा लढवून अधिक आमदार आणता येतील त्याचवेळी ठाकरे व शरद पवार यांनाही लोकसभेप्रमाणे ही निवडणूक सोपी जावू नये व पुन्हा विधानसभेचे गणित जुळलेच तर पुढच्या वेळीही अजित पवार यांना सत्तेत सहभागीही करून सत्ता हस्तगत करण्याची व्यापक रणनीती दडलेली असल्याचा ठाम दावा असल्याचेही या सूत्रांनी केला.

(हेही वाचा – Water Pipe Lines : भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘त्या’ दोन्ही जलवाहिन्यांची ठाण्याला होते अडचण)

लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांना मिळणारी मतं फक्तं शरद पवारांनाच मिळाली. तर अजित पवार ऐनवेळी भाजपासोबत गेल्यानं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीमुळे उफाळून आल्याने पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामूळेच आता अजित पवार यांना सामंजस्याने वेगळे लढयला लावले आणि त्यांनीही मविआच्या उमेदवारांपुढे तगडे उमेदवार दिले तर यामुळे मविआची मते तर फुटतीलच त्याचवेळी याचा फटका शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटालाही बसू शकतो,अशी राजकीय गणिते जुळवली जात असून यामुळेही अजितदादांना वेगळं लढवण्याचा प्लॅन असल्याची चोख बंदोबस्त भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर तयार करण्यात आल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. (Assembly Elections)

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या असून यासाठी बैठकाही घेतल्या जात आहेत. यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर या आठवड्यात येणार आहेत. याच बैठकीत शहा हे याची स्पष्ट कल्पना अजित पवार यांना देतील. आणि त्यांना स्वबळावर लढण्यास राजी करतील. राहिला रसद पुरवठा तर भाजपा नेते जर अजितदादा स्वबळावर लढण्यास राजी झालेच तरं पडद्यामागून हवा तेवढा रसद पुरवठा तर करतीलच शिवाय निवडणुकीतील प्रचारात त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांनाही सांभाळून घेतली. शिवाय त्यांच्या संस्थांनाही सांभाळून घेतील. आणि प्रचारात टीका करण्याची वेळ आलीच तरं त्यांचा सर्व रोख हा मवीआचे उमेदवार व त्यांचे प्रचारातील अन्य नेते हेच असतील. इतकेच काय त्यांना सरकारी योजनांचा ही प्रचार करण्यास मुभा असेल. हे सर्व यासाठी की लोकसभा निवडणूकीत म्हणावे तसे यश भाजपालाही न मिळाल्याने त्यांना गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच मित्र पक्षांना सत्तेत सोबत घ्यावे लागले हे शल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य शिर्सास्था नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे असे मानले जाते,असेही या सूत्रांनी यावेळी ठामपणे नमूद केले.

(हेही वाचा – Cabinet Decision : करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा)

सध्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) हवा तापू लागली आहे. तर दुसरीकडे पावसाने अचानक पुन्हा बरसायला सुरूवात केली आहे. अशात या निवडणूकीत भाजपा व शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांसमोर तुल्यबळ उमेदवार न देता राज ठाकरे यांच्या मनसे ने मवीआच्याच उमेदवारांसमोर तगडे उमेदवार द्यावेत तसेच दुसरीकडे तिसरी आघाडी निर्माण करून अपक्षांना धरून चौरंगी पंचरंगी कशी करता येईल याकडे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा कटाक्ष असून मनसे व चौथी आणि पाचवी आघाडीचे जितके उमेदवार उभे राहतील त्यांना साम, दाम, दंड, भेद, नितीने मदत कऱण्याची रणनीतीही तयार झाली आहे. आता प्रत्यक्षात महायुती मधील भाजपाची पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी येत्या गुरुवार किंवा रविवारी दिल्लीतून जाहीर होईल. तरं त्याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व राज ठाकरे यांची मनसे ची यादीही जाहीर करण्यात येईल असाही ठाम दावा या सूत्रांनी व्यक्त केला.

फक्तं भाजपाच्या यादीचे हे खास वैशिष्ट असेल की जास्तीत जास्त निष्ठावंतांना उमेदवारी दिली जाईल आणि ज्यांना उमेदवारी देणे शक्य नाही असे भांडुप विधानसभा मतदार संघाचे माजी मनसे आ. मंगेश सांगळे, प्रवीण दरेकर अशांना मनसे कडून रणांगणात उतरवले जाईल. तरं हर्षवर्धन पाटील सारख्यांना अपक्ष उतरवून सांगलीची लोकसभेची पुनरावृत्ती केली जाईल. पण एकमात्र खरे की, या जीवन मरणाच्या निवडणूकीत भाजपा कडून अधिकाधिक अपक्ष उमेदवार उतरवून कोणत्याही परिस्थितीत २०२४ ला सत्ता हस्तगत करायचीच असा ठाम निश्चय भाजपा नेतृत्वाने केल्याने कधी न्हवे ती यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीचीच होणार असेही या सूत्रांनी शेवटी बोलताना स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.