Assembly Elections 2024 : उबाठा गटाने कॉंग्रेसला बजावले, म्हणाले येत्या विधानसभेत आम्ही… 

268
Assembly Elections 2024 : उबाठा गटाने कॉंग्रेसला बजावले, म्हणाले येत्या विधानसभेत आम्ही... 
Assembly Elections 2024 : उबाठा गटाने कॉंग्रेसला बजावले, म्हणाले येत्या विधानसभेत आम्ही... 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीमधील शिवसेना उबाठा गट (UBT Group), कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Congress Sharad Chandra Pawar group) गटाला किती जागा मिळणार यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दारम्यान, जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने काँग्रेसला आम्ही २८८ जागांवर लढू शकतो, असे ठणकावून सांगितले आहे. (Maharashtra Election 2024)

चंद्रपूर येथे स्थानिक नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे (Congress District President Subhash Dhote) यांनी चंद्रपुरातील सर्व ६ जागा लढवणार असल्याचे म्हटले होते. याला मुंबईच्या माजी महापौर आणि उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिले. पेडणेकर म्हणाल्या की, शिवसेना उबाठा गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी २८८ जागा लढवू असा इशारा कॉंग्रेसला दिला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने किशोरी पेडणेकर चंद्रपूरमध्ये उपस्थित होत्या.

(हेही वाचा – काँग्रेस नेत्याविरोधात Shiv Sena महिला आघाडी आक्रमक)

आम्ही स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरु केलेली आहे. जिल्हाप्रमुख अशा पद्धतीने शड्डू ठोकत असतील तर ते मान्य नाही. शिवसेना उबाठा गटाचे वरिष्ठ नेते, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ यांचा मिळून जो काही निर्णय होईल तो होईल. परंतु, अशा पद्धतीने होत असेल तर आम्ही ऐकणार नाही. जिल्हाप्रमुख आवाज करत असेल तर प्रतिभाताई धानोरकरांना निवडून देताना आणि उमेदवारी जाहीर करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आहे, हे विसरु नका. असे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.