Assembly Election Results 2024 : अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये एकही उमेदवार जिंकवता आला नाही

146
Assembly Election Results 2024 : अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार; 'या' जिल्ह्यांमध्ये एकही उमेदवार जिंकवता आला नाही
Assembly Election Results 2024 : अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार; 'या' जिल्ह्यांमध्ये एकही उमेदवार जिंकवता आला नाही
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभुतपूर्व यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघापैकी तब्बल २३२ जागा महायुतीच्या पदरात पडल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त पन्नासचा आकडा गाठता आला नाही.संसदेत विरोधी पक्षनेते पद असलेल्या कॉंग्रेसची या निवडणुकीत दाणादाण उडाली आहे.  (Assembly Election Results 2024)
एकेकाळी राज्यावर निर्विवाद सत्ता राखणाऱ्या कॉंग्रेसची जबरदस्त पीछेहाट झाली आहे. कॉंग्रेसने महाविकास आघाडीत शंभर पेक्षा अधिक जागा लढल्या होत्या. मात्र त्यांच्या वाट्याला फक्त १६ जागांवर समाधान मानवे लागले आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेसला भोपळालाही फोडता आला नसल्याची आकडेवारी समोर येत आहे.विधानसभा निवडणुकीत राज्यातील ३६ जिल्ह्यापैकी तब्बल २३ जिल्ह्यात कॉंग्रेस हद्दपार झाली आहे. (Assembly Election Results 2024)
आत्तापर्यंत कॉंग्रेसने महाराष्ट्रला अनेक काळ मुख्यमंत्री दिला आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांचाच पराभव झाला आहे. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या अतुल भोसले यांनी पराभव केला आहे. याचसोबत मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेही पराभूत झाले आहेत. (Assembly Election Results 2024)
या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही
याचसोबत धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, बीड, धाराशीव, सोलापुर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापुर या जिल्ह्यात कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एवढा मोठा पराजय काँग्रेसच्या पदरी कधी पडला नाही.  (Assembly Election Results 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.