Assembly Election : उबाठा, शेकापमध्ये रस्सीखेच! इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरु, काँग्रेसचाही दावा

110
Assembly Election : उबाठा, शेकापमध्ये रस्सीखेच! इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरु, काँग्रेसचाही दावा
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा कोणत्याही वादाशिवाय होत असल्याचे आघाडीचे नेते सांगत आहेत. शिवाय ही चर्चा सामंज्यस्याने होत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र पडद्यामागे अनेक गोष्टी आणि वाद उफाळून येत आहेत. आता आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि समाजवादी पक्ष हे काही जागांवर अडून बसले आहेत. दोन्ही पक्षांनी या जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आघाडीत पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा कसा काढायचा असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. उरण विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांनी दावा केला आहे. यामध्ये शिवसेना उबाठा व शेकाप यांच्यात रस्सीखेच पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी आपल्या प्रचारदेखील सुरु केल्याचे दिसत आहे. काँग्रेसचाही या मतदारसंघावर दावा आहे. असे असले तरी उमेदवारीसाठी उबाठाचा क्रम वरचा असल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून तोडफोड!)

उरण विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळी अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी उबाठाचे मनोहर भोईर यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव केला होता. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. आमदार बालदी अपेक्षेप्रमाणे भाजपाला जॉईन झाले आहेत. शिवसेनेत फूट पडली असली तरी नव्या तयार झालेल्या आघाडीत काँग्रेस शेकाप हे दोन नवे भिडू मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढाई झाल्यास महाआघाडीचा उमेदवार निवडून येण्याची संधी आहे. यात शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर यांचा क्लेम वरचा आहे. मात्र लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरु झाली आहे. शेकापचे म्हात्रे यांनी देखील संधी मिळाल्यास उरणमधून निवडणूक (Assembly Election) लढण्याची इच्छा प्रकट केली आहे. मी महाविकास आघाडीकडून इच्छुक आहे.

(हेही वाचा – Sion Koliwada मध्ये झळकले बॅनर : ‘सायन कोळीवाडा जनता का आशीर्वाद…राजेश्री राजेश शिरवडकर के साथ’)

शेकाप नेते जयंत पाटील जो आदेश देतील, त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे मत प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. तर आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही निवडणूक (Assembly Election) लढविणार असून उमेदवारी संदर्भात जो निर्णय वरिष्ठ घेतील तो आपल्याला मान्य असेल असे मत माजी आ. मनोहर भोईर यांनी व्यक्त केले आहे. तसेच आपण अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत बिघाडी झाली तर ती भाजपाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.