Assembly Election 2024 : सत्ता कुणाचीही असो, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला रिपीट होणार

115
Assembly Election 2024 : सत्ता कुणाचीही असो, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला रिपीट होणार
Assembly Election 2024 : सत्ता कुणाचीही असो, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला रिपीट होणार

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर दि. २० नोव्हेंबरला संध्याकाळी एक्झिट पोल आले. त्यामधील ९ एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे सांगण्यात आले होते. तर काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असे चित्र दाखवण्यात आले. मात्र हे पोल किती खरे ठरतात, हा प्रश्न उपस्थित होतोच. परंतु यासगळ्यात एक शक्यता आहे की, विधानसभेत महायुती किंवा महाविकास आघाडी आघाडीपैकी एकाला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यात अपक्ष उमेदवार किंगमेकरच्या रुपात असतील. (Assembly Election 2024)

( हेही वाचा : Mumbai – Pune Expressway वर भीषण अपघात; बसमधील ११ प्रवासी जखमी

दरम्यान महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले तर एका पक्षाला मुख्यमंत्रीपद आणि अन्य दोन पक्षांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. महायुतीचे सरकार आले तर सध्याच्या फॉर्म्युला म्हणजे एका पक्षाला मुख्यमंत्रीपद आणि अन्य दोन पक्षांना उपमुख्यमंत्रीपद हे सूत्र कायम असेल. मात्र मुख्यमंत्रीपद हे संख्याबळाच्या आधारावर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार महायुतीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल. ज्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाण्याची चिन्ह आहेत. त्यात ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपद मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, असे मानले जाते. (Assembly Election 2024)

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष सुरुवातीपासून मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे संख्याबळाचा फॉर्म्युला इथेही लागू होईल. मात्र मुख्यमंत्रीपद एका पक्षाला आणि अन्य दोघांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. त्यात ही मविआत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), नाना पटोले(Nana Patole), सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. अशावेळी मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण यासगळ्यात दोनपैकी ज्यांना बहुमत मिळेल त्यांचेच सरकार येईल की नाही? असा प्रश्न आहे. कारण २०१९ चा अनुभव आपण अनुभवला आहे. २०१९ च्या घटनाक्रमाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. (Assembly Election 2024)

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.