Assembly Election 2024 : माहीम विधानसभेतील मतदानाचा टक्का वाढला, शहरातील सर्वाधिक मतदान माहीममध्ये

297
Election : राज्यात पुढच्या महिन्यातच पुन्हा निवडणुकांचे बिगुल वाजणार, सहा जागांसाठी होणार निवडणूक ?
  • सचिन धानजी,मुंबई

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई शहरातील माहीम विधानसभा मतदार संघात  ५८ टक्के मतदान पार पडले. शहरातील दहा विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत या मतदार संघात सर्वांधिक मतदान झाले असले तरी प्रत्यक्षात सन २०१४ च्या तुलनेत कमी आणि सन  २०१९च्या तुलनेत जास्त मतदान यंदाच्या निवडणुकीत माहीम विधानसभा मतदार संघात झाल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही मागील निवडणुकीत अनुक्रमे ५८. ५१ टक्के आणि ५३.२० टक्के एवढे मतदान झाले होते. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा ५ टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढला असला तरी सन २०१४च्या तुलनेत मात्र शुन्य पूर्णांक ६१ने घसरल्याचे दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा- शिंदे, फडणवीस, पवार की ठाकरे… Maharashtra चा मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कुणाला?)

माहीम विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर, मनसेचे अमित राज ठाकरे आणि उबाठा शिवसेनेचे महेश सावंत हे तीन प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात होते आणि तिघांमध्ये काँटे की टक्कर होत आहे. मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदार संघांमधील मतदानाचा टक्क्केवारीत माहीममध्ये सर्वांधिक मतदान झाल्याचे पहायला मिळत आहे. माहीम पाठोपाठ वडाळा विधानसभा  ५७.३७ टक्के, शिवडी ५४.४२ टक्के, भायखळा ५३ टक्के, मलबार हिल ५२.५३ टक्के, शीव कोळीवाडा ५१.४३ टक्के, धारावी ४९.०७ टक्के,  वरळी, ४७.५० टक्के, मुंबादेवी ४६.०१ टक्के, कुलाबा ४४. ४९ टक्के अशाप्रकारे मतदान पार पडले. (Assembly Election 2024)

 यंदाच्या या निवडणुकीत सदा सरवणकर हे महायुतीचे उमेदवार असले तरी भाजपाने संपूर्ण ताकद मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या पाठिशी उभी केल्याने मनसेची ताकद वाढली गेली. मात्र, माहीममध्ये मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदान केंद्रावर तिन्ही पक्षांचा बोलबाला असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असे दिसत असले तरी उबाठा शिवसेनेची भिस्त ज्या माहीम भागातील मतदारांवर होती, त्या भागांमध्ये मशाल ऐवजी धनुष्यबाणच अधिक चालल्याचे दिसून आले. त्यामुळे निवडणूक निकाल स्पष्ट नाही. (Assembly Election 2024)

(हेही वाचा- Exit Poll 2024: लोकसभेला एक्झिट पोलचा अंदाज चुकला, आता विधानसभेला काय होणार ?)

सन २०१४मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि माहीममध्ये त्या निवडणुकीत ५८.५१ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर हे विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या सन २०१९च्या निवडणुकीत युती झाली आणि यामध्ये  ५३.२० टक्के मतदान झाले होते, त्यातही शिवसेनेचे सदा सरवणकर हे विजयी झाले होते. परंतु यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत निवडणूक झाल्याने मतांची टक्केवारी मात्र सन २०१४च्या तुलनेत काही अंशी कमीच असल्याचे दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत सरासरी ५ टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढलेला पहायला मिळत असून महापालिकेने केलेल्या जनजागृतीमुळे की निवडणूक रिंगणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित आणि उबाठाचे महेश सावंत यांच्यासाठी मतदार घराबाहेर पडला असा प्रश्न उपस्थित होत असून याचे उत्तर शनिवारी निवडणूक निकालांमधून स्पष्ट होईल. (Assembly Election 2024)

(हेही वाचा- Assembly Election 2024 : राज्यात ६५.११ मतदान, ३० वर्षानंतर राज्यात मतदारांचा सर्वाधिक प्रतिसाद)

माहीम विधानसभा मतदार संघातील मागील दोन निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी आकडेवारी

सन २०२४ : ५८ टक्के

सन २०१९ :  ५३.२० टक्के

 सन २०१४ :  ५८.५१ टक्के 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.