Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा किती पक्ष रिंगणात? 

188
बुधवारी २० नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये (Constituency) एकाच टप्प्यात मतदान होणार असून शनिवारी २३ नोव्हेंबर मतमोजणी होईल. तसेच येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी १८ नोव्हेंबर थांबला. मागील काही दिवसांपासून प्रचारसभांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, एका मराठी दैनंदिन वृत्तपत्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात (Political Party) आहेत यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. (Assembly Election 2024)

दिलेल्या माहितीनुसार, १९६२ ते २०२४ च्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात (Maharashtra Election) पक्षांची संख्या वाढून ती आता १५८ वर पोहोचली आहे. १९६२ च्या निवडणुकीत केवळ १० पक्ष रिंगणात होते, तर त्यातील ६ पक्षांना आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळाले होते. २०१९ मध्ये तब्बल १२४ पक्षांनी निवडणूक लढविली. त्यातील केवळ १५ पक्षांना आमदार निवडून आणण्यात यश मिळाले.    

पक्ष तर काढले, यश किती? 
१९६२ पासून अनेकांनी पक्ष स्थापन करून निवडणुकीत उमेदवार केले असले तरी त्यांना मिळालेले यश जेमतेमच राहिले आहे. १९८५ पर्यंत पक्ष कमी होते आणि त्यांचे उमेदवारही निवडून येत होते. मात्र, १९९० नंतर पक्ष संख्या वाढल्यानंतर पक्षांचे उमेदवार (Assembly candidate) निवडून येण्याचे प्रमाण  कमी होत गेले. २०१४ मध्ये, तर ९० पक्षांनी निवडणुकीत उमेदवार उभे केले, त्यातील केवळ १२ पक्षांना आपला उमेदवार जिंकून आणता आले. या पक्षांमुळे मत विभागणीला चालना मिळाली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.