Assembly Election 2024 : चांदिवली, कुर्ल्यात नावाशी साधर्म्य असणारे डमी उमेदवार

137
Assembly Election 2024 : चांदिवली, कुर्ल्यात नावाशी साधर्म्य असणारे डमी उमेदवार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर या सर्व छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील तीन मतदारसंघांमध्ये चक्क नावाशी साधर्म्य असणारे डमी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहेत. यामध्ये चांदिवली विधानसभेमध्य शिवसेनेचे उमेदवार मामा लांडे आणि कुर्ल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मिलिंद (अण्णा) कांबळे यांच्या नावाचे उमेदवार उभे आहेत. (Assembly Election 2024)

चांदिवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्यावतीने दिलीप लांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. दिलीप लांडे यांच्यासोबत काँग्रेसच्यावतीने नसीम खान यांच्यासह मनसेचे महेंद्र भानुशाली या उमेदवाराशिवाय छोटे पक्ष आणि अपक्ष असे एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. तर याच मतदारसंघात दिलीप पंडित लांडे हे अपक्ष उमेदवार असून हे उमेदवार बीड तालुक्यातील घाटसावळी गावातील आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election वर सी व्हॉटर्सचा सर्व्हे; कोणाची चिंता वाढवली? )

याबरोबरच कुर्ला विधानसभा मतदारसंघातून मिलिंद (अण्णा) कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, मिलिंद कांबळे यांच्या नावाशी साधर्म्य असणारे मिलिंद अण्णा कांबळे हे बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कांबळे हे माजी आमदार असून बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले मिलिंद कांबळे हे उल्हासनगर ३ मध्ये राहणारे आहेत. (Assembly Election 2024)

तर मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे उदेश पाटेकर यांच्या वडिलांच्या नावाशी साधर्म्य असणारे उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहे. उबाठा शिवसेनेचे उमेदवार संदेश शांताराम पाटेकर हे आहेत, तर अपक्ष उमेदवार म्हणून राकेश शांताराम पाटेकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राकेश शांताराम पाटेकर हे कांदिवली चारकोप सेक्टर पाचमध्ये राहणार आहेत. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.