Assembly Election 2024 : मुलुंडमध्ये मागील ३५ वर्षांत भाजपाने दिला नाही एकही मराठी चेहरा

944
Maharashtra Assembly Election : राज्यात ९.७ कोटी मतदार; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईतील मुलुंडमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठी मराठी मुद्द्यावरून वाद रंगलेला असतानाच लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर केली, आणि या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील हे विजयी झाले. कोटेचा यांचा पराभव झाला. परंतु या लोकसभेतील मुलुंड विधानसभेत मागील ३५ वर्षांत मराठी आमदाराचा चेहरा दिसलेला नाही. विशेष म्हणजे १९९५ नंतर भाजपाने एकाही मराठी उमेदवाराला मुलुंडमधून उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे येथील मराठी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तब्बल ६० टक्के मराठी मतदार असताना भाजपा कायम गुजराती किंवा सिंधी, पंजाबी उमेदवार लादत असल्याने ही नाराजी अधिक तीव्र होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून भाजपाने मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली. परंतु शिवाजी नगर मानुखर्द विधानसभा मतदारसंघात कोटेचा हे पिछाडीवर असल्याने तसेच इतर मतदारसंघात कमी मताधिक्य मिळाल्याने त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जात असले तरी कोटेचा याचा पराभव हा भाजपाच्या पदाधिकारी व नेते यांना विश्वासात न घेता त्यांना बाजूला ठेवत घेतलेला निर्णय कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. (Assembly Election 2024)

मुलुंड मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच मराठी व अमराठी मुद्दयाची चर्चा होती आणि त्यातच अमराठी उमेदवार दिल्याने मराठी उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवाराकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड विधानसभा मतदारसंघात सन १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून येणाऱ्या भाजपाचे सरदार तारासिंग यांना वयोमानानुसार उमेदवारी न देता त्यांच्याऐवजी सन २०१९मध्ये मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये मिहिर कोटेचा या ८७, २५७ मते मिळवून विजयी झाले होते. परंतु यंदाची स्थिती वेगळी असून या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून या जागेवर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून चरणजित सिंग सप्रा आणि राकेश शेट्टी यांची नावे चर्चेत असून मराठी चेहरा म्हणून उत्तम गिते यांचेही नाव चर्चेत आहे. तर उबाठा शिवसेनेकडून मुलुंडमध्ये चेहरा असून नसून बाहेरुन उमेदवार आयात करावा लागेल असे बोलले जात आहे. तर मनसेकडून सत्यवान दळवी यांचे नाव प्रथेप्रमाणे चर्चेत असले तरी प्रत्यक्षात मनसेकडून ही लढवली जावी की नाही याबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. तर भाजपाकडून पुन्हा कोटेचा यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी मराठी वादा फटका त्यंना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – बालविवाह रोखण्यासाठी जागरूकता हवी, कायद्यात अनेक त्रुटी; Supreme Court नेमकं काय म्हणालं?)

मुलुंड विधानसभा हा युतीमध्ये भाजपाच्या वाट्याला येत असून भाजपाने १९९० नंतर एकही मराठी उमेदवाराला संधी दिली नाही. १९९० मध्ये भाजपाने वामनराव परब यांना उमेदवारी दिली होती. ते निवडून आले. पण पाच वर्षानंतर त्यांना पुन्हा संधी न देता भाजपाने किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली. सोमय्या हे पश्चिम उपनगरात राहत असताना त्यांना मुलुंडला आणले. पण त्यानंतर सोमय्या खासदार बनल्यानंतर सरदार तारासिंह यांना उमेदवारी दिली. तारासिंह हे चार टर्म निवडून आल्यावर आजार पणामुळे २०१९ मध्ये मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली. पण मागील पाच टर्म या विधानसभेत गुजराती नेत्यांचा वरचष्मा राहिला आहे. या विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मराठी मतदार आहेत, तर २० ते २२ टक्के गुजराती आणि उर्वरित उत्तर भारतीय, सिंधी, ख्रिश्चन आदी समाजाचे मतदार आहे. पण येथील गुजराती समाज हा मराठी उमेदवाराला निवडून देत असताना काही गुजराती नेते हे फक्त मराठी माणसाला उमेदवारी मिळवू देत नाही. आज विभागात पक्षाला काम करणारा नेता लागत नाही तर वरिष्ठ नेत्याच्या जवळ राहिल्यास उमेदवारी मिळते हे आजवर दिसून येत आहे. मुलुंड विधानसभेत उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आणि काँग्रेसची ताकद असल्याने कोटेचा यांना घाम आणला जाण्याची शक्यता आहे. परंतु कोटेचा यांना उमेदवारी न दिल्यास मराठी चेहऱ्यांमध्ये प्रभाकर शिंदे आणि प्रकाश गंगाधरे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. (Assembly Election 2024)

सरदार तारासिंग यांच्या पहिल्या उमेदवारी पासून मुलुंड मधील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश गंगाधरे केवळ इच्छुक उमेदवार म्हणून राहिले आहेत. पक्षाने त्यांना नेहमी या सामान्य कार्यकर्त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. मुलुंडवर भाजपाने गेली ३५ वर्षे याबाबतीत दुर्लक्ष केले आहे. मुलुंडमध्ये मराठी मतदारांची संख्या जास्त असून इतर भाषिक मतदारांपेक्षा गुजराती भाषिक मतदारांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तरी देखील भाजपातील मराठी भाषिक नेते मंडळी गुजराती नेत्यांच्या आणि लक्ष्मीपुत्रांच्या दबावाला बळी पडून अमराठी उमेदवार लादत असल्याचा आरोप स्थानिक लोकांकडून केला जात आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – मुंबईत माजी महापौर Datta Dalvi यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ )

मुलुंड विधानसभा निवडणूकीत आतापर्यंत दिलेले मराठी उमेदवार आणि निवडून आले आमदार

१९७५ : दत्ता सामंत, काँग्रेस
१९७८: प्रभाकर पटवर्धन, जनता पार्टी
१९८५ : दिना बाबा पाटील, काँग्रेस
१९९० : वामनराव परब, भाजपा

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.