“उत्तर द्या ! नाहीतर पेंग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा”, Ashish Shelar यांच आदित्य ठाकरेंना प्रत्त्युत्तर

167
"उत्तर द्या ! नाहीतर पेंग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा", Ashish Shelar यांच आदित्य ठाकरेंना प्रत्त्युत्तर

आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) धारावी पुनर्विकास योजनेवरुन भाजपवर जोरदार आरोप केले होते. धारावीत 300 एकर पुनर्विकासाच टेंडर अदानीला दिलंय. मुंबईतील तुमची आमची जमीन अदानीला फुकटात दिलीय. कुर्ला, मढ, देवनार येथील जमिन अदानींना दिलीय. मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातलीय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. यावर आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्त्युत्तर देत आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे.

(हेही वाचा-Vidhansabha Election 2024: निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा, राजकीय फोटो नसलेल्या किटचे होणार वाटप)

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 1080 एकर आकडा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यासोबतच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या, असे आवाहनही दिले आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.. खोटं बोलून पळ काढू नका ! 1080 एकर आकडा आला कुठून? अदानीच्‍या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा. उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही ? उत्तर द्या ! आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या !! नाहीतर पेग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा !” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.