सिनेट निवडणूका अराजकीय व्हाव्यात; Ashish Shelar यांची मागणी

79
मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार; Ashish Shelar यांचा आरोप
  • प्रतिनिधी

होऊ घातलेल्या विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उबाठाचे उमेदवार हे विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचे हित जोपासणारे असून त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेला हरताळ फसला जात आहे, असा जाहीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी (२३ सप्टेंबर) पत्रकारांशी बोलताना केली.

(हेही वाचा – Mukhyamantri mazi ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता)

आ. अॅड. शेलार (Ashish Shelar) पुढे म्हणाले की, सिनेटच्या होऊ घातलेल्या निवडणूका अराजकीय व्हाव्यात अशी भाजपाची इच्छा असून जे उमेदवार उबाठाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का ? सगळ्या निवडणुकीची राजकीय बोळवण केली आहे. बोगस मतदार नोंदणी झाली तेव्हा आम्ही आक्षेप घेतला होता. आधी नोंदवले गेलेले पदवीधर सेनेच्या शाखेतून निर्माण केलेले पदवीधर होते. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाचे झेंडे दिसू नयेत अशी कुलगुरूंना विनंती असून अभाविप विद्यार्थ्यांसाठीची एकमेव संघटना असल्याचा दावा शेलार यांच्या केला.

(हेही वाचा – भरत गोगावले यांची अखेर MSRTC च्या अध्यक्षपदावर वर्णी; पदभार स्वीकारला)

दरम्यान, अभाविपचे मुख्यमंत्र्यांवर आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अॅड. शेलार म्हणाले की, त्यांना मुद्दा मांडण्याचा अधिकार असून अभाविपच्या प्रत्येक मताशी भाजपा सहमत नाही. अजित पवारांसाठी भाजपा शिंदेंचं चक्रव्यूह अशा बातम्या आल्या आहेत त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर अॅड. शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, ही कपोल कल्पित बातमी आहे आणि आता भाजपा, शिवसेना आणि अजित पवारांचा सामना करण्याची ताकदही मविआ हरवून बसल्यानेच खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जात आहे. कारण जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीहून हात हलवत आले आणि मेळाव्यात मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका मांडा असे म्हणाले तेव्हा काँग्रेसने तर दाद दिली नाहीच, पण पवारांनीही चांगलेच फटकारले. खरं तर तेव्हाच काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीने वेळ पडली तर उबाठाला सोडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे, असा दावाही आमदार अॅड. शेलार यांनी केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.