Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का! CBI कडून गुन्हा दाखल

134
Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का! CBI कडून गुन्हा दाखल
Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का! CBI कडून गुन्हा दाखल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयकडून (CBI) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर आहे. सीबीआयने या प्रकरणी आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनादेखील आरोपी बनवलं आहे. याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात जबाब दिला होता. त्यानंतर, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयकडून गुन्हा दाखल
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समर्थक असणाऱ्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघातील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता. याच प्रकरणांमध्ये आता अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून (CBI) गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

अनिल देशमुख यांच ट्विट

गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विट करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. अनिल देशमुख ट्विट करत म्हणाले, “धन्यवाद… देवेंद्रजी फडणवीस! (Devendra Fadnavis) माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहेत. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे.” (Anil Deshmukh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.