हिंसक घटनांमुळे अमित शाहांची बिहारच्या सासाराम येथील सभा रद्द

3

बिहारच्या सासाराममध्ये शुक्रवारी झालेल्या गोंधळामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २ एप्रिल रोजी होणारी सभा पुढे ढकलण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते संजय मयुख यांनी शनिवारी ही माहिती दिली. मात्र, अमित शाह यांचा पटना आणि नवाडाचा पूर्वनियोजित कार्यक्रम होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री शनिवारी संध्याकाळी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. अमित शाह सम्राट अशोकाच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहून सासाराम येथील जाहीर सभेला संबोधित करणार होते. परंतु, शुक्रवारी सासाराममधील गोंधळामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, २ एप्रिल रोजी नवाडा येथे त्यांची सभा होणार आहे. अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी सासाराममध्ये झालेल्या गोंधळावरून भाजपने नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी टीका केली. ‘सत्ताधारी पक्षांना अमित शाह यांची सासाराम भेट पचनी पडली नाही. शाह ज्या, ज्या वेळी बिहार दौऱ्यावर येतात, त्यावेळी नितीश सरकारची अस्वस्थता वाढते, असा टोला देखील सिन्हा यांनी लगावला आहे.

सासाराम शुक्रवारी येथे दोन गटात हाणामारी झाली. यानंतर जोरदार दगडफेक आणि जाळपोळ झाली. या गोंधळात अनेकजण जखमी झाले. यानंतर परिसरात इंटरनेट बंद करण्यात आले आणि कलम १४४ लागू करण्यात आले. सासाराममधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपद्रव पसरवणाऱ्या १८ जणांना अटक करण्यात आली आहे. सासाराम येथे सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांची सभा महत्त्वाची मानली जात होती. रेल्वे मैदानावरही मोठी जाहीर सभा होणार होती. त्यासाठी प्रदेश भाजपच्या नेत्यांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र, आता शाह यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

(हेही वाचा – संजय राऊत धमकी प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, दारुच्या नशेत…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.