Amit Shah दोन दिवस मुंबईत?

97
Amit Shah दोन दिवस मुंबईत?
Amit Shah दोन दिवस मुंबईत?

भाजपा नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) रविवार १७ नोव्हेंबर २०२४ या दिवशीचा नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला परतले, अशी चर्चा असली तरी शाह दिल्लीला नाही तर पुढील दोन दिवस मुंबईत असणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांकडून देण्यात आली. राज्यात बुधवारी २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शाह मुंबईतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असतील, असे सांगण्यात आले.

(हेही वाचा – ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही…’,Eknath Shinde यांचं मोठं वक्तव्य; राहुल गांधींना दिलं आव्हान)

कसा होता विदर्भ दौरा

नियोजित कार्यक्रमानुसार अमित शाह (Amit Shah) रविवारी १७ नोव्हेंबरला विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी रविवारी दुपारी १२ वाजता अमित शाह (Amit Shah) यांची गडचिरोली शहरात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती, तर दुपारी १ वाजता वर्धा शहर, दुपारी ३ वाजता काटोल, नागपूर ग्रामीण आणि ४ वाजता सावनेर या ठिकाणी प्रचार सभा नियोजित होत्या. मात्र शनिवारी सायंकाळी उशिरा शाह यांचा विदर्भ दौरा रद्द झाला आणि ते थेट दिल्लीला रवाना झाल्याची बातमी पसरली.

(हेही वाचा – आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते; Surajya Abhiyan चे आवाहन)

बीकेसीतील प्रसिद्ध हॉटेल

शाह यांचा विदर्भ दौरा रद्द झाला असला तरी ते दिल्लीला नाही, तर मुंबईच्या बीकेसीमधील राजकीय बैठकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या एका हॉटेलमध्ये पुढील दोन दिवस राहणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. या दोन दिवसांत शाह काही महत्वाच्या व्यक्तींची भेट घेण्याची शक्यता असून निवडणूक रणनीतीबाबत चर्चा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.