गोळीला तोफ गोळ्याने प्रत्युत्तर देऊ; Amit Shah यांचा इशारा

135
गोळीला तोफ गोळ्याने प्रत्युत्तर देऊ; Amit Shah यांचा इशारा

जम्मू-काश्मिरात गोळीबार केल्यास त्याला तोफ-गोळ्यांनी उत्तर दिले जाईल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिला. राज्यातील सुरनकोट येथे शनिवारी (२१ सप्टेंबर) आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी शाह यांनी दहशतवाद आणि विरोधी पक्षांवर जबरदस्त हल्ला चढवला.

यावेळी शाह (Amit Shah) म्हणाले की, यंदाची निवडणूक ३ घराण्यांची राजवट संपवणार आहे. अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी ही तीन घराणी आहेत. या तिन्ही घराण्यांनी राज्यात लोकशाही थांबवली होती. जर, २०१४ मध्ये भाजपा सरकार आले नसते तर पंचायत, ब्लॉक आणि जिल्हा निवडणुका झाल्या नसत्या, असे अमित शाह यांनी सांगितले. याचबरोबर, अमित शाह यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादासाठी या तीन कुटुंबांना जबाबदार धरले.

(हेही वाचा – Air Marshal Amar Preet Singh हे नवीन हवाई दल प्रमुख ; ३० सप्टेंबरला स्वीकारणार पदभार)

शाह (Amit Shah)  म्हणाले की, १९९० च्या दशकात फारुख यांच्या मेहरबानीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आला. त्यावेळी इथे मोठ्या प्रमाणात गोळीबार व्हायचा, कारण इथले सूत्रधार पाकिस्तानला घाबरत होते. पण आता पाकिस्तान नरेंद्र मोदींना घाबरत आहे. गोळीबार करण्याचे त्यांच्यात धाडस नाही. गोळीबार झाला तर गोळीबाराला गोळ्यांनी उत्तर दिले जाईल, असे अमित शाह म्हणाले. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू-काश्मिरात सुमारे ३५ वर्षे राज्य केले. दहशतवाद वाढला, ४० हजार लोक मारले गेले. जम्मू-काश्मीर ३ हजार दिवस बंद राहिले. यासाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स) जबाबदार आहे.

एवढेच नाही तर, आता खोऱ्यात गोळीला गोळ्याने प्रत्युत्तर दिले जाईल, असेही शाह यांनी बजावले. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने आपल्याला आरक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवले. त्यांचे पोट अद्यापही भरलेले नाही. आरक्षणासंदर्भात आम्ही पुन्हा विचार करू, असे नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यान म्हटले आहे. उमर साहेब, आपण डोंगरा समाजाच्या आरक्षणाला हातही लावू शकत नाही. डोंगरा समाजाचे खरे हितचिंतक नरेंद्र मोदी दिल्लीच्या सिंहासनावर आहेत, कुणी आरक्षणाला हातही लावू शकत नाही असे शाह (Amit Shah)  यांनी सांगितले. भाजपाने डोगरा, गुर्जर आणि बकरवाल यांना नोकऱ्यांसोबतच पदोन्नतीतही आरक्षण देण्याचे ठरवले असून हा या समाजाचा हक्क असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.