Amit Shah यांची राहुल गांधींवर सडकून टीका; म्हणाले, राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म माहिती आहे का ?

111
Amit Shah यांची राहुल गांधींवर सडकून टीका; म्हणाले, राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म माहितेय का ?
Amit Shah यांची राहुल गांधींवर सडकून टीका; म्हणाले, राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म माहितेय का ?

हरियाणातील विधानसभेच्या (Haryana Legislative Assembly) ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सर्वच पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (२७ सप्टेंबर) रेवाडी (Haryana, Rewadi) येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला की, काँग्रेस आणि राहुल गांधी यांना खोटे बोलणे आणि अफवा पसरवणे याशिवाय काहीच कळत नाही. यावेळी शाहांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. (Amit Shah)

(हेही वाचा – Assembly Election : उबाठा, शेकापमध्ये रस्सीखेच! इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरु, काँग्रेसचाही दावा)

राहुलबाबा, खरीप आणि रब्बी पिके कोणती असतात? 

हरियाणामध्ये कॉंग्रेसची सत्ता असताना कट, कमिशन आणि भ्रष्टाचार यांचा मोठ्या प्रमाणात भर होता. व्यापारी, दलाल आणि जावयाचे राज्य होते. पण, भाजपा सरकारमध्ये ना डीलर उरले ना दलाल, जावयाचा प्रश्नच नाही. राहुल गांधींना कुणीतरी सांगितले की, एमएसपीच्या मुद्द्यावरुन मते मिळतात. पण, मूळात राहुल यांना एमएसपीचा फुल फॉर्म माहितेय का? खरीप आणि रब्बी पिके कोणती असतात, त्यातील फरक तरी त्यांना माहीतेय का?” असा खोचक टोला ही अमित  (Rahul Gandhi Amit Shah) शाह यांनी लागावला. 

‘अग्निनीरबाबत काँग्रेस खोटे बोलत आहे’ 

अमित शहा म्हणाले की, आम्ही गुजरातमधून आलो आहोत. हरियाणाला तिथे खूप मान दिला जातो. सैन्यातील प्रत्येक दहावा सैनिक याच भूमीतून येतो. पण काँग्रेसने कधीही लष्कराचा आदर केला नाही. तो अग्निवीर योजनेबाबत (Agniveer Yojana) खोटारडेपणा पसरवत आहे. मी तुम्हाला वचन देतो की एकही अग्निवीर पेन्शनसह राहणार नाही.  

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या पुढील हंगामात फ्रँचाईजींना ५ खेळाडू कायम ठेवता येणार?)

वन रँक वन पेन्शनवर काँग्रेसने दिशाभूल केली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये हरियाणामधून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली, तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते की, आम्ही लष्करातील जवानांची वन रँक-वन पेन्शनची (One Rank-One Pension) मागणी पूर्ण करू, आपल्या लष्कराचे जवान ४० वर्षांपासून ही मागणी करत होते. काँग्रेस ४० वर्षे वन रँक वन पेन्शन लागू करू शकली नाही, आता मोदींनी वन रँक वन पेन्शन योजना लागू केली,” असेही शाह म्हणाले. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.