Ajit Pawar Video: बारामतीत अजित पवारांच्या बॅगा तपासल्या! म्हणाले, “खा…”

147
Ajit Pawar Video: बारामतीत अजित पवारांच्या बॅगा तपासल्या! म्हणाले, "खा..."

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभुमीवर बडे नेते प्रचारासाठी अनेक दौरे करत आहेत. दरम्यान, राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. आज (१३ नोव्हें.) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.

अजित पवारांनी (Ajit Pawar) फोनवर बोलत असातान स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर. असं अजित पवार अधिकाऱ्यांना म्हणाले. (Ajit Pawar)

उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र-गोवा सीमेवर तिसऱ्यांदा तपासणी
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र-गोवा सीमेवर इन्सुली चेक पोस्टवर गाडी अडवण्यात आली. ज्या अधिकाऱ्याने गाडी अडवली, तो क्षणात तिथून गायब झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी गाडीची काच खाली केली. ते संतापलेले दिसत होते. त्यांच्यासोबत यावेळी गाडीमध्ये शेजारी पुत्र तेजस ठाकरे बसले होते. सिंधुदुर्गात आज उद्धव ठाकरे यांच्या तीन प्रचार सभा आहेत. (Ajit Pawar)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.