Ajit Pawar:अजित पवार यांच्या सासरी ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशी बॅनरबाजी!

मला शंभर टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल Ajit Pawar

40
Ajit Pawar
Ajit Pawar:अजित पवार यांच्या सासरी ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशी बॅनरबाजी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरून राजकीय वर्तुळातील चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही आहेत. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरून पुन्हा नव्याने चर्चा रंगू लागल्या. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला शंभर टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी प्रबळ इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा –बारसूमध्ये रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण थांबवा; अजित पवारांची मागणी)

 

तेरचे जावई ,आमचे नेते… 

त्यावरून आता पोस्टरबाजी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव येथील तेर हे अजित पवार (Ajit Pawar) यांचे सासर आहे. सध्या त्या तेरमधून अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या विधानावरून जोरदार बॅनरबाजी सुरु झाली आहे. तिथे अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर झळकले आहेत. तेर गावातील चौकाचौकात “तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार,” अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

हेही पहा –

यापूर्वी देखील पुण्यातील कोथरुढ येथे ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ या आशयाचे बॅनर झळकले होते. तर राष्ट्रवादीच्याच काही कार्यकर्त्यांकडून देखील जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.