Ajit Pawar चुका मान्य करू लागलेत; पवारांचे नक्की चालले तरी काय?

129

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गडचिरोली येथे एका मेळाव्याला संबोधित करताना कुटुंबाचा अर्थ सांगितला आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या वडिलांसोबत राहा. कोणत्याही प्रकारची चूक करू नका. वडील जेवढे प्रेम करतात तेवढे कोणीही आपल्या मुलीवर करू शकत नाही. घरात फूट पाडण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते योग्य नाही, जनसामान्यांना हे आवडत नाही. याचा अनुभवही मी या संदर्भात घेतला आहे. त्यानंतर मी माझी चूक मान्य केली. या आणि अशाच काही स्टेटमेंटमुळे अजित पवार यांच्याबाबत साशंकता येते. दादांना झालेली ही उपरती म्हणावी की स्ट्रॅटेर्जी?

महिनाभराआधी बारामती लोकसभा संदर्भात केले होते असे स्टेटमेंट

याआधीदेखील लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभे केले होते. त्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी वेळ आहे, त्याची जाहीरपणे कबुली दिली. राजकारण घरात येऊ देऊ नये असे त्यांनी म्हटले. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महायुतीचा भाग असलेल्या त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत खराब कामगिरी केली असताना अजित पवार यांच्याकडून ही चूक झाली आहे असे म्हणणे बरेच काही सांगून जात आहे.

(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी घेतले गणरायाचे दर्शन)

सोमवार, ९ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागचा राजा च्या दर्शनासाठी आले, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे उपस्थित होते, पण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मुंबईत असूनही उपस्थित नव्हते, यावरून अजित पवार यांनी विशिष्ट संकेत दिले आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

सहानुभूतीसाठी केली गेलेली ही वक्तव्य – संजय राऊत

कुटुंबात फूट पडू देऊ नका, ती चूक मी केली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेकानेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी तर अजित पवार यांची खिल्ली उडवत एजन्सीने लिहून दिलेले अजितदादा बोलले असतील, असे म्हणत सहानुभूतीसाठी त्यांनी वक्तव्य केल्याचे अप्रत्यक्षपणे म्हणाले.

तुम्ही तुमचे स्वतःचे घर मोडले. तुमचा पक्ष सोडला. शरद पवार, जे की तुमचे नेते आहेत आणि जे तुमच्या वडिलांसारखे आहेत. ज्यांनी तुम्हाला सर्व काही दिले, त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. आता तुम्ही खंजीर खुपसला असेल, तर पश्चात्ताप करुन काय उपयोग?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील काही दिवसांपासून केलेली वक्तव्य पाहता त्यांना झालेली ही उपरती म्हणावी की येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सहानुभूती मिळवत पुन्हा यश मिळवण्यासाठी केलेली ही स्ट्रॅटेर्जी तर नाही ना? कारण मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये अजित पवार यांची परिस्थिती पाहिली तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच काहीशी दिसून येते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.