विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यात अचानकपणे ईव्हीएमविरोधात अवडंबर माजवण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी मविआने निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचे खोटे नेरेटिव्ह सेट करण्यासाठी त्यांची इको सिस्टीम कार्यरत झाली आहे. त्यासाठी बाबा आढाव यांना आत्मक्लेश आंदोलन करण्यास भाग पाडले. पुण्यातील फुले वाड्यात हे अंदोलन सुरु असताना शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी लागलीच हजेरी लावली, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) हेही या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी बाबा आढाव यांच्यासमोर बोलताना, जनतेने दिलेला कौल मान्य केला पाहिजे, असे ठणकावून सांगितले.
काय म्हणाले अजित पवार?
संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे बाबा आढाव यांनी आपले मत मांडले. काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी तर काही सर्वोच्च न्यायालयाशी संबधित आहेत. त्यामुळे त्यांना जे योग्य वाटते त्यानुसार त्यांनी निकाल दिले आहेत. खरंतर वयस्कर लोकांना मतदार केंद्रावर जाऊन त्रास होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने ८५ वर्ष्यांच्या व्यक्तींच्या घरी जाऊन मतदान करण्याची योजना राबवली होती. लवकर अंधार होत असल्याने लाईटची सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आली होती, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्या. आमच्या १७ जागा आल्या. हा जनतेचा कौल असल्याचे आम्ही मान्य केले. त्यावेळी ईव्हीएमबद्दल कुणी बोलले नाही. बारामतीमध्ये मी जो उमेदवार उभा केला होता तो ४८ हजार मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच सात महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीत मीच ४८ हजारांची भर काढून १ लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनताच म्हणत होती लोकसभेला ताईला आणि विधानसभेला दादाला. त्यामध्ये जनतेने कुणाचे ऐकले नाही. जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार, असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.
(हेही वाचा Establishment of power : सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी होणार शपथविधी)
१९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकांनी वाजपेयींना मतदान केलं आणि विधानसभेला विलासराव देशमुखांना केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. मतदार लोकसभेला शरद पवारांना आणि विधानसभेला मला मतदान करत होता. तरीही शरद पवारांना ८५ हजार तर मला ५० हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यावेळी मी असे म्हटले नाही की मला २५ हजार मते कमी का पडली. हा लोकांचा कौल होता आणि तो मान्य केला पाहिजे. काही पराभूत उमेदवार मला सांगतात की आमचा पराभव झाला. मी त्यांना सिद्ध करुन दाखवा असे सांगतो. नाना पटोले परवा म्हणाले की संध्याकाळी कसे मतदान वाढले. साडेचार आणि पाचच्या पुढे लोक रांगेत आले मग त्यांना आतमध्ये घेतले. माझ्या इथे सकाळी सात ते नऊ पाच टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदान संपेपर्यंत टक्केवारी १५ टक्क्यांनी वाढली. त्याला आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी रांगेत यायचे आणि कधी मतदान करायचे तेच ठरवणार, असेही अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community