१० मिनिटांत Ajit Pawar मंत्रिमंडळाच्या बैठकीतून का निघून गेले? कारण आलं समोर

390
१० मिनिटांत Ajit Pawar मंत्रिमंडळाच्या बैठकीतून का निघून गेले? कारण आलं समोर
१० मिनिटांत Ajit Pawar मंत्रिमंडळाच्या बैठकीतून का निघून गेले? कारण आलं समोर

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात काल (१० ऑक्टो.) महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. मात्र काही वेळाने अजित पवार बैठकीतून बाहेर आले. या बैठकीला संपूर्ण वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते पण अजित पवार (Ajit Pawar) अचानक बाहेर पडल्यानंतर नाराजीच्या चर्चांना उधाण आले. मात्र राष्ट्रवादीचे इतर मंत्री यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा-Pune Hit and run : ऑडी चालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू)

या सगळ्या उलटसुलट चर्चांनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ‘मी काल कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता. त्यासाठी नांदेड विमानतळ येथे जायचे होते, कॅबिनेट 11 वाजता होती. ही बैठक नियोजित वेळेपेक्षा उशीरा सुरु झाली. महत्वाच्या विषयांची चर्चा कॅबिनेटमध्ये झाल्यानंरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून मी नियोजित लातूर उदगीर येथे कार्यक्रम यासाठी निघालो. त्यामुळे मी कॅबिनेटची बैठक 10 मिनिटात सोडली ही संपूर्ण खोटी माहिती आहे.’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

(हेही वाचा-Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! परतीच्या पावसाचा जोर वाढणार, १४ जिल्ह्यांना अलर्ट)

रतन टाटांना अभिवादन करण्यासाठी अजितदादा लवकर गेले, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. मागील काही कॅबिनेट बैठकात अर्थ विभागाने ताशेरे ओढल्यानंतर देखील विविध संस्थांना जमिनी देणे असे ऐनवेळी निर्णय घेतले जात असल्याने अजित पवारांची नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Ajit Pawar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.