Ajit Pawar Jan Sanman Yatra ८ ऑगस्टपासून दिंडोरीतून होणार सुरू

३९ विधानसभा मतदारसंघात अजितदादा जनतेशी संवाद साधणार : सुनिल तटकरे

186
Jammu-Kashmir Assembly Elections : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार 'इतक्या' जागा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ‘जनसन्मान यात्रा’ (Ajit Pawar Jan Sanman Yatra) ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू होणार असून त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली.

लोकशाहीवर आमचा विश्वास असल्यानेच आम्ही ‘जनसन्मान यात्रा’ (Ajit Pawar Jan Sanman Yatra) हे नाव ठेवले आहे. काही योजना अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी आखल्या असून त्या योजना जनतेपर्यंत पोचवाव्यात हा यात्रेचा उद्देश असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन सभा किंवा कार्यक्रम घेणार आहोत. महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी अजितदादा संवाद साधतील, असे तटकरे यांनी सांगितले.

(हेही वाचा – bangladesh violence: बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फोडला)

पहिल्या पाच दिवसानंतर सलग पाच दिवस पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी, हडपसर, मावळ, पिंपरी, खेड आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघात तर त्यानंतर मुंबई उपनगरमधील बांद्रा ईस्ट, कुर्ला, मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, ठाणे जिल्ह्यातील ऐरोली, मुंब्रा-कळवा, भिवंडी ईस्ट, शहापूर या मतदारसंघात नंतर विदर्भातील नागपूर वेस्ट, काटोल, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, ब्रम्हपुरी, गडचिरोली, अहेरी या मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. (Ajit Pawar Jan Sanman Yatra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.