Sharad Pawar यांचा फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

89
Sharad Pawar यांचा फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
  • प्रतिनिधी 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेची निवडणूक स्वत:च्या ताकदीवर लढावी आणि त्यांनी निवडणुकीच्या प्रचार सामुग्रीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या फोटोचा वापर करू नये, असे आदेश बुधवारी (१३ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाची प्रचार सामुग्री न्यायालयापुढे सादर केली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (एपी) उमेदवार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या प्रचार सामुग्रीत केवळ शरद पवार यांचा फोटो वापरला असल्याचे न्यायालयाला सांगितले.

(हेही वाचा – Crime News: निवडणूक पथकाचे अधिकारी असल्याचे भासवत 5 भामट्यांनी व्यापाऱ्याला घातला 25 लाखांचा गंडा)

न्यायालयाने 6 नोव्हेंबर रोजी ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात 36 तासांच्या आत देण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले होते. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) गटाने बुधवारी न्यायालयात दाखल केलेले पोस्टर्स बनावटी असल्याचा दावा अजित पवार गटाचे वकिल बलबीर सिंग यांनी केला. तर, सिंघवी यांनी मिटकरी यांच्या सोशल मिडीया अकाउंटहून पोस्ट केलेला व्हिडिओ न्यायालयाला दाखविला.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत महाराष्ट्राची जनता अनभिज्ञ आहे असे आपल्याला वाटते काय? असा प्रश्न न्यायमूती सूर्यकांत यांनी विचारला. यावर सिंघवी म्हणाले की, न्यायालयाने एक आदेश दिला आहे आणि त्याचे पालन करणे बंधनकारक आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांची बिहारला 12,100 कोटी रुपयांच्या योजनांची भेट )

‘महाराष्ट्राची जनता हुशार आहे. शरद पवार (Sharad Pawar) कोण आहेत आणि अजित पवार कोण आहेत? हे जनतेला चांगले ठाउक आहे. कुणाला मतदान करायचे आणि कसे करायचे, याची त्यांना जाणीव आहे. ते अचूक निर्णय घेतील यात आम्हाला किंचितही शंका नाही. हा व्हिडिओ प्रभावित करेल किंवा नाही करणार. परंतु न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हायला पाहिजे’, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अजित पवार गटाला म्हटले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.