Ajit Pawar यांनी भरसभेत १३ कोटी जनतेची माफी मागितली; नेमकं काय प्रकरण? 

134
Ajit Pawar यांनी भरसभेत १३ कोटी जनतेची माफी मागितली; नेमकं काय प्रकरण? 
Ajit Pawar यांनी भरसभेत १३ कोटी जनतेची माफी मागितली; नेमकं काय प्रकरण? 

सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Forts) नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. नौदल दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी दुपारच्या सुमारास हा पुतळा अचानक कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. विरोधकांनीही महायुती सरकारला धारेवर धरलं. दुसरीकडे वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. महाविकास आघाडीने (MVA) या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करण्याचे ठरवलं आहे. मात्र या सगळ्या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागितली आहे. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Sardar Patel Engineering College: मुंबईतील प्राध्यापकाला विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन भोवलं; कारवाई करत, पगारवाढ रोखली )

अजित पवारांनी मागितली माफी 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Statue of Shivaji Maharaj collapsed) पडला. मात्र, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या १३ कोटी लोकांची जाहीर माफी मागतो. यातील सर्व दोषी लोकांवर कडक कारवाई करू असे आश्वासन देखील त्यांनी जनतेला दिले. या पुतळ्याचे काम चांगलेच झाले पाहिजे होते, हे सर्व लोक राष्ट्रनिर्मिती करण्यात अग्रेसर राहिले आहेत. त्यांचे विचार कायमच आपणास प्रेरणा देत असतात. यातील जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही. आज शब्द देतो की अशी चूक पुन्हा होऊ, नये यासाठी काम करू. 

(हेही वाचा – रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी JJ Hospital मध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञान)

महिलांवरील अत्याचारात कोणाचीही गय केली जाणार नाही

बदलापूरला (Badlapur School Case) दुःखद घटना घडली आहे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायम काम केले जाईल. महिला सुरक्षेसाठी कायमच प्राधान्य दिले जाईल. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील दोषींना फाशी आणि जन्मठेप सुनावण्यात येणार आहे.असली विकृती पुन्हा कोणी करू नये, यासाठी कायदा आणखीन कडक केला जात आहे, कोणत्याही पातळीवर हायगाय केली जाणार नाही. कोणी हायगय केली तर तोही जेलमध्ये टाकला जाणार आहे, अशा शब्दात महिला अत्याचाराच्या (Women’s oppression) घटनांवर अजित पवारांनी भाष्य केलं. येथील, सभेत एक महिला सातत्याने महिला असा सूर उंचावला, त्यावर अजित पवार यांनी टिप्पणी केली आहे. ( Ajit Pawar)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.