विधानसभा निवडणुकीत ५ जागांवर AIMIM पक्ष दुसऱ्या स्थानावर

202
विधानसभा निवडणुकीत ५ जागांवर AIMIM पक्ष दुसऱ्या स्थानावर
विधानसभा निवडणुकीत ५ जागांवर AIMIM पक्ष दुसऱ्या स्थानावर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएम (AIMIM) पक्षाने २० हजार ते ५० हजार मते वेगवेगळ्या अल्पसंख्याक मतदारसंघात मिळवली आहेत. महाराष्ट्रात मुस्लिम लोकसंख्या ११. ५६ टक्के असून ३१ विधानसभा मतदारसंघात २० टक्के अल्पसंख्याकांची मते आहेत. एमआयएम पक्षाने विधानसभेत १६ जागा लढवल्या. त्यातील मालेगाव मध्यच्या जागेवर त्यांना विजय मिळवता आला.

( हेही वाचा : Assembly Election Result 2024 : तुतारी पुन्हा फोडणार ट्रम्पेटवर खापर

दरम्यान महाराष्ट्र विधानसभेत ५ जागांवर एमआयएम (AIMIM)पक्ष दुसऱ्या स्थानावर होता. तर तीन जागांवर एमआयएम तिसऱ्या आणि चार जागांवर सहाव्या आणि पाचव्या स्थानावर एका जागेवर राहिला. मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपने १३ जागांवर उमेदवार उभे केले. त्यातील १० जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला. भाजपाचा एकूण वोट शेअर ७७ टक्के असून मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपाचा वोट शेअर सर्वाधिक १९,९ टक्के इतका आहे. भाजपानंतर शिवसेना उबाठा पक्ष ७ मुस्लिमबहुल जागांवर उमेदवार उभे केले, त्यातील ५ जागांवर शिवसेना उबाठाचे उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेने ६ मुस्लिमबहुल जागांवर आणि काँग्रेसने ४ मुस्लिमबहुल मतदारसंघात विजय मिळवला.

तसेच एमआयएमचे (AIMIM)मालेगाव मध्यचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद यांनी सपा उमेदवाराचा पराभव करत १६२ मतांनी विजय मिळवला. सपाचे उमेदवार असणाऱ्या आसिफ रशिद (Shaikh Asif Shaikh Rashid) यांना १ लाख ९ हजार ४९१ मते मिळवली. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून एमआयएमचे अध्यक्ष इम्तियाज जलील (Syed Imtiaz Jaleel) यांचा भाजपाच्या अतुल सावे यांनी २ हजार १६१ मताधिक्य मिळवत पराभव केला. त्याचबरोबर मानखुर्दे शिवाजीनगर मतदारसंघात तीन वेळा आमदार राहिलेले सपाचे अबु आझमी (Abu Azmi) यांना एमआयएमचे उमेदवार अतिक खान यांनी लढत दिली. ते दुसऱ्या स्थानावर राहिले. त्याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवाब मलिक (Nawab Malik) चौथ्या स्थानावर राहिले. (AIMIM)

दरम्यान औरंगाबाद मध्यमध्ये शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांनी (AIMIM)च्या नसीर सिद्दीकी यांचा ८ हजार ११९ मतांनी पराभव केला. तिथे शिवसेना उबाठाचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांना ३७ हजार ९८ मते मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. अनेक जागांवर मविआच्या उमेदवारांनी एआयएमच्या उमेदवारांची विकेट घेतली आहे, असे निकालावरून स्पष्ट होते. तर शिवसेना उबाठाचे वर्सेावा विधानसभेचे उमेदवार हारुण खान यांनी भाजपाच्या भारती लव्हेकर यांचा १ हजार ६०० मतांनी पराभव केला.

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.