मराठी रंगभूमीसह टॉलिवूड गाजवणारे Actor Sayaji Shinde यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

175

आगामी विधानसभा निवडणुक (Assembly Elections) तोंडावर आल्यामुळे, राज्याच्या राजकरणाला उधाण आले आहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुक होणार असल्याची राजकारणात चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या घटना घडत असतात. अशातच मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (Actor Sayaji Shinde)

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मुंबईत विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी हिंदी, मराठी, तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी पक्षात प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून सयाजी शिंदे हे सामाजिक उपक्रमात चांगले सक्रिय आहेत. शिंदेंच्या  सामाजिक कार्याची राज्यभरात चर्चाही झाली. मात्र, सामाजिक कार्यानंतर आता सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी राजकारणात प्रवेश करत अजित पवारांच्या उपस्थितीत घड्याळ हाती बांधलं आहे.

या पक्ष प्रवेशावेळी मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांचं कौतुक केलं. भुजबळ म्हणाले की,’ सायाजी शिंदे आता अभिनेते आहेतच पण आता ते नेते होणार.’ खरं तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सयाजी शिंदे यांनी आपल्या कामाने मोठा ठसा उमटवला आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा विविध भाषेच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अशा शब्दात सयाजी शिंदे यांचे कौतुक केले.     

(हेही वाचा – SEESCAP संस्थेचा ‘शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४’ पुरस्काराने सन्मान)    

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit pawar) यांची मुंबईत शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.