Bangladesh विरुद्धच्या Cricket मालिकेच्या प्रायोजकांवर, त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन

131
Bangladesh विरुद्धच्या Cricket मालिकेच्या प्रायोजकांवर, त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन!
  • खास प्रतिनिधी 

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या कत्तली होत असून हिंदू महिलांवर त्यांचे पिता, पती, भावांसमोर बलात्कार होत आहेत. अशा परिस्थितीत केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटमधील प्रथम स्थान कायम ठेवण्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिका (India Bangladesh Test Series) आयोजित करणे निव्वळ षंढपणाचा कळस असून देशवासीयांनी या मालिकेच्या प्रयोजकांच्या उत्पादनावर बहिष्कार घालावा, असे कळकळीचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले आहे.

.. हा निष्ठुरतेचा आणि षंढपणाचाही कळस

“बांगलादेशमध्ये हिंदुच्या कत्तली होत आहेत. मुली-महिलांवर त्यांच्या पती, पिता, पुत्र आणि भावांसमोर बलात्कार होत आहेत. धार्मिक स्थळे नष्ट होत आहेत. गणेशोत्सव आणि दुर्गा पूजेवर कठोर नियंत्रणे घातली जात आहेत आणि अशा वातावरणात भारताने ही मालिका आयोजित करणे, हा निष्ठुरतेचा कळस आहे,” असे मत रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.

“मालिका आयोजन ही एकप्रकारे क्रूर थट्टा असून केवळ क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रथम स्थान कायम राहावे यासाठी ही मालिका आयोजित करणे, हा षंढपणाचाही कळस आहे,” अशा शब्दांत रणजित सावरकर यांनी संताप व्यक्त केला.

(हेही वाचा – विधानसभेच्या जागा वाटपाचा पेच संपला; Chandrakant Bawankule यांनी सांगितला नवा फॉर्म्युला)

‘भेटा आणि जाब विचारा’

‘हिंदुस्स्थान पोस्ट’ने या मालिकेवर बहिष्कार घातला असून प्रखर राष्ट्रभक्तांनी, राष्ट्रीय वृत्तपत्रांनी आणि प्रसार माध्यमांनीही या मालिकेवर बहिष्कार घालावा, असे आवाहन करत “मालिका मागे घेतली नाही तर तुमच्या जवळच्या क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटा आणि जाब विचारा. त्याचप्रमाणे ज्या कंपन्या मालिकेला स्पॉन्सर करत असतील, त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला,” अशी भावना सावरकर यांनी व्यक्त केली.

इद्राय स्वाहाः, तक्षकाय स्वाहाः

सावरकर पुढे म्हणाले, “इद्राय स्वाहाः, तक्षकाय स्वाहाः, म्हणजेच आपल्या संस्कृतीचा आदेश आहे, जर स्वतः इंद्रदेखील विषारी तक्षकाच्या सहाय्याला आला, तर त्याचीही आहुती द्यावी, असा महाभारताचा उपदेश आहे!”

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांनी लालबाग राजाच्या चरणी केली ‘ही’ प्रार्थना)

आर्थिक बहिष्कार घाला

भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिका (India Bangladesh test series) १९ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. याविषयावर सुदर्शन टीव्ही या वृत्तवाहिनीवरील ‘बिंधास्त बोल’ या कार्यक्रमात रणजित सावरकर म्हणाले होते की, ‘भारतीय जनतेने या कसोटी मालिकेवर (India Bangladesh test series) बहिष्कार टाकला पाहिजे. बांगलादेशावर आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे. या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून आपण त्यांना केवळ मान्यताच देत नाही, तर आपण त्यांना अर्थ पुरवठाही करत आहोत.’

‘हिंदूच मारले जातात, हा इतिहास आहे’

1946 मध्ये बांगलादेशातील नोआखली आणि टिपरा जिल्ह्यात एकही हिंदू उरला नव्हता. आपण सर्वजण इतिहास विसरत चाललो आहोत. त्यानंतर 1971 च्या आधीच्या पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी लष्कराने जे अत्याचार केले ते हिंदूंवरच केले. त्यामुळे 1971 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्याचे दोन तुकडे झाले. आज इतक्या वर्षांनंतर भारतातील जमात-ए-इस्लामी, पाकिस्तानातील जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेशातील जमात-ए-इस्लामी एकत्र आले आहेत. एका कुटिल षडयंत्रामुळे बांगलादेशातील सरकार बदलले, आताचे सरकार हे हिंदूविरोधी, भारत विरोधी आहे, असेही रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार? जाणुन घ्या…)

आठ कोटी हिंदूंची हत्या

1947 पासून आतापर्यंत बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सुमारे 8 कोटी हिंदू मारले गेले आहेत. त्याविरोधात हिंदूंनी चकार शब्द काढला नाही. काश्मीरमध्ये 1989 मध्ये जे घडले, त्यापेक्षा अधिक हत्या आज बांगलादेशात होत आहेत. हा हिंदू धर्मावर आघात आहे. आपल्या सरकारने आम्ही बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करू, असे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता सरकारने केली पाहिजे, असेही रणजित सावरकर म्हणाले.

‘गद्दारांशी संबंध नको’

अफगाणिस्तान, बांगलादेशात काहीही घडले, तेथील दोन राजकीय पक्षांमध्ये वाद झाला, अथवा कोणतीही घटना घडली, तरी तिथे हिंदूच मारले जातात. आपल्याही देशात CAA विरोधात आंदोलन झाले, त्यातही हिंदूच मारले गेले. जोवर हिंदू जागरूक होत नाही तोवर हे असेच होत राहणार आहे. मी हिंदूंना आवाहन करतो की, आपल्याकडे एकच शस्त्र आहे, ते म्हणजे खिशातील पैसे. आपला पैसा शत्रू राष्ट्रांत कदापि जाता कामा नये. अशी प्रतिज्ञा हिंदूंनी घेतली पाहिजे. आपण त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवता कामा नये. खेळाविषयी भावनिक न होता, आपण भारत-बांगलादेश कसोटी मालिकेवर (India Bangladesh test series) बहिष्कार टाकला पाहिजे. ते गद्दार आहेत, त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवता कामा नये, असेही आवाहन रणजित सावरकर यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.