Maharashtra Election Results 2024 : मुंबईत ३२ पैकी २५ विद्यमान आमदार पुन्हा विजयी;, मात्र कुणाचे मताधिक्य घटले?

119
Maharashtra Election Results 2024 : मुंबईत ३२ पैकी २५ विद्यमान आमदार पुन्हा विजयी;, मात्र कुणाचे मताधिक्य घटले?
Maharashtra Election Results 2024 : मुंबईत ३२ पैकी २५ विद्यमान आमदार पुन्हा विजयी;, मात्र कुणाचे मताधिक्य घटले?

मुंबईतील अनेक मतदारसंघात विद्यामान आमदारांचे विजयाचे मताधिक्य कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीच्या ३२ पैकी २५ विद्यामान आमदारांनी पुन्हा एकदा विधानसभेत विजय मिळवला आहे. मात्र २०१९ च्या तुलनेत विजयी आमदारांच्या मताधिक्यात लक्षणीय घट झालेली आहे. (Maharashtra Election Results 2024 )मुंबई जिल्ह्यात ३६ विधानसभा मतदारसंघात ३२ विद्यामान आमदार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी २५ आमदारांनी आपला मतदारसंघात रखत विजय मिळवला. शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांचे कुर्ला विधानसभा मतदारसंघात ८० टक्के मताधिक्य घटले आहे. २०१९ ला कुडाळकर २१,०१३ मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत त्यांना फक्त ४,१८७ इतके कमी मताधिक्य मिळाले आहे.

( हेही वाचा : Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिर प्रसिद्ध का आहे ? तुम्हाला या न ऐकलेल्या गोष्टी माहीत आहेत का?)

या मतदारसंघात ३८ टक्के मराठी भाषिक मतदार आणि मुस्लिम मतदार ३२ टक्के आहेत. त्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांना ६८ हजार ५७६ मते मिळाली आहेत. तर वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरे यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले आहे. २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना ६७ हजार ४२७ इतके मताधिक्य होते, मात्र २०२४ ला आदित्य ठाकरे ८,८०१ मतांनी विजयी झाले आहेत. यामध्ये वरळीत शिवसेनेचे मिलिंद देवरा (Milind Deora) निवडणुक रिंगणात असल्याने आदित्य ठाकरे यांना विजयासाठी कठोर परिश्रम करावे लागले. (Maharashtra Election Results 2024 )

३२ पैकी पुन्हा २५ उमेदवारांच्या गळ्यात आमदारकीची माळ

मुंबई जिल्ह्यातील ३२ पैकी २५ उमेदवारांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला आहे. त्यात मुलूंड मतदारसंघातून मिहिर कोटेचा, कुलाबामधून राहुल नार्वेकर, कांदिवलीमधून अतुल भातखळकर, चारकोपमधून योगेश सागर, अंधेरी पश्चिममधून अमित साटम, विलेपार्लेतून पराग अळवणी, मलबार हिलमदून मंगल प्रभात लोढा, वडाळ्यातून कालिदास कोळंबकर, सायन- कोळीवाडातून कॅप्टन तमिळ सेल्वन, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार (Ashish Shelar), घाटकोपरमधून पराग शाह, दहिसरमधून मनीषा चौधरी, गोरेगावमधून विद्या ठाकूर असे १३ भाजपाचे उमेदवार पुन्हा निवडून आले आहेत.

तर शिवसेनेकडून चांदिवलीतून दिलीप लांडे, मागाठाणेतून प्रकाश सुर्वे हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. त्याशिवाय महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या अमिन पटेल यांनी मुंबादेवीतून आणि मालाडमधून अस्लम शेख यांनी विजय मिळाला आहे. तर शिवसेना (उबाठा)चे कलिनातून संजय पोतनीस, विक्रोळीतून सुनील राऊत, शिवडीतून अजय चौधरी, दिंडोशीतून सुनील प्रभू आणि वरळीतून आदित्य ठाकरे असे ५ उमेदवार निवडून आले आहेत. (Maharashtra Election Results 2024 )

कोणत्या पक्षाच्या उमेदवारांचे मताधिक्य घटले?

विलेपार्लेतून पराग अळवणी यांचे मताधिक्य २०१९ च्या तुलनेत ३,४९२ मतांनी घटले आहे. तर मलबार हिल मतदारसंघातून मंगल प्रभात लोढा यांचे मताधिक्य २०१९ च्या तुलनेत ३,८५३ मतांनी घटले. कालिदास कोळंबकर यांचे ४ हजार १५६ मतांनी मताधिक्य घटले. सायन- कोळीवाडातून कॅप्टन तमिळ सेल्वन यांचे मताधिक्य ६ हजार ५६ मतांनी घटले आहे. वांद्रे पश्चिममधून ६ हजार ५७६ मतांनी आशिष शेलार यांचे मताधिक्य घटले. तर घाटकोपरमध्ये पराग शाह यांचे १५ हजार ८१८ मतांनी मताधिक्य घटले. दहिसरमधून मनीषा चौधरी यांचे १९ हजार ५८८ मतांनी मताधिक्य घटले आहे. तर भाजपामधील सर्वात जास्त मताधिक्य गोरेगावमधील विद्या ठाकूर यांचे २५ हजार ३०७ मतांनी घटले आहे.

शिवसेनेतील कुर्ला विधानसभेचे उमेदवार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांचे मताधिक्य १६ हजार ८२६ मतांनी घटले आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे अस्लम शेख यांचे मताधिक्य ४ हजार १५६ मतांनी घटले आहे. तर शिवसेना (उबाठा)मधील विक्रोळीतील सुनील राऊत यांचे १२ हजार ३१५ मतांनी घटले आहे. शिवडीतून अजय चौधरी ३२ हजार १९७ मतांनी मताधिक्य घटले आहे. तर दिंडोशीतून सुनील प्रभू यांचे मताधिक्य ३८ हजार ३२९ मतांनी घटले आहे. आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे मताधिक्य ५८ हजार ६२६ मतांनी घटले आहे. तसेच समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांचे मताधिक्य १२ हजार ८४८ मतांनी घटले आहे. (Maharashtra Election Results 2024 )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.