Assembly Election : मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघात १०५ उमेदवार निवडणूक रिंगणात

699
मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी सोमवारी उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम १०५ उमेदवार निवडणूक  रिंगणात आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी  दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या सोमवारच्या अखेरच्या दिवशी १२ जणांनी माघार घेतली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये  २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
धारावी मतदारसंघातून ०३, वरळी मतदारसंघातून ०२, भायखळा मतदारसंघातून ०५ तर कुलाबा मतदारसंघातून ०२ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत  त्यामुळे धारावी विधानसभा मतदारसंघातील (१२)सायन कोळीवाडा( १५ )वडाळा विधानसभा ( ०९)माहिम विधानसभा( ०६) वरळी विधानसभा (१०)शिवडी विधानसभा( ०७) भायखळा विधानसभा (१४)मलबार हिल विधानसभा( ०८) मुंबादेवी विधानसभा( ११) आणिकुलाबा विधानसभा मतदारसंघातील (१३) एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून या सर्वांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.

Voter helpline App चा वापर करा

Voter helpline App -* मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल.
*KYC App -* उमेदवारांबाबत माहिती या ॲपवर उपलब्ध होऊ शकेल
*Cvigil* ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे १०० मिनिटांत निराकरण केले जाते.
*मतदार हेल्पलाईन क्रमांक.*  १९५०
*जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्रमांक-* ०२२-२०८२२७८१
*निवडणूक नियंत्रण कक्ष –* ७९७७३६३३०४

मुंबई शहर जिल्ह्याबाबतची माहिती…

एकूण मतदान केंद्र – २५३८
उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र  १५६
सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र  १००
झोपडपटटी परिसरात मतदान केंद्र  ३१३
मुंबई शहर जिल्हयात मंडपातील मतदान केंद्र  १०१
पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्र  १७

विधानसभा मतदार संघनिहाय मतदार संख्या

धारावी – २६१८६९
सायन-कोळीवाडा  – २८३२७१
वडाळा – २०५३८७
माहिम –  २२५९५१
वरळी –  २६४५२०
शिवडी –  २७५३८४
भायखळा – २५८८५६
मलबार हिल – २६११६२
मुंबादेवी –  २४१९५९
कुलाबा – २६५२५१

मतदारांची एकूण संख्या – २५ लाख ४३ हजार ६१०*

• महिला  –  ११ लाख ७७ हजार ४६२
• पुरुष –  १३ लाख ६५ हजार ९०४
• तृतीयपंथी – २४४
• ज्येष्ठ नागरिक (८५+) – ५३ हजार ९९१
• नवमतदार संख्या (१८-१९ वर्ष) –  ३९ हजार ४९६
• दिव्यांग मतदार –  ६ हजार ३८७
• सर्व्हिस वोटर – ३८८
• अनिवासी भारतीय मतदार – ४०७

मतदार यादीत नाव तपासून घ्या!

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले. मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे,  असे यादव यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.