मुख्यमंत्री दौऱ्यावर असूनही केला ६५ फाईल्सचा निपटारा!

141
मुख्यमंत्री cm eknath shinde

सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे ( व्हीसी) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला.

( हेही वाचा : Whatsapp Feature : झुकरबर्गने फेसबुकवरून सांगितले व्हॉट्सअ‍ॅपचे फिचर! काय आहे ते जाणून घ्या)

मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर 

मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून नियमित निपटारा करण्यात येतो. सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला तसेच सूचना ही दिल्या.

सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून एकनाथ शिंदे यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.