योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाकडून 112 हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता.

42
योगी आदित्यनाथ
Yogi adityanath

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात लखनऊ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांची ५०० कोटींच्या घोटाळ्याबाबत CBI कडे तक्रार! पंतप्रधान-ईडीला केले टॅग )

योगी आदित्यनाथ यांना धमकी

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करण्याची धमकी आली होती. त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाकडून 112 हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्यावर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच ठार करणार असल्याचे व्यक्तीने म्हटले आहे. ही धमकी येताच हा फोन घेणाऱ्या ऑपरेटरने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर कलम 506, कलम 507 आणि आयटी ऍक्ट कलम 66 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धमकी देणारा अज्ञात कोण आहे ? याचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.