1 of 6

चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) एकदिवसीय स्वरूपात खेळली जाते. ही स्पर्धा १९९८ मध्ये पहिल्यांदा खेळली गेली. त्यावेळी बांगलादेशने (Bangladesh) चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले होते. यानंतर ही स्पर्धा २०००, २००२, २००४, २००६, २००९, २०१३ आणि २०१७ मध्ये खेळली गेली. (Champions Trophy)

Champions Trophy, Ind vs NZ Final : चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीसाठी दुबईत १ लाख लोकांची तिकिटासाठी झुंबड
Champions Trophy, Ind vs NZ Final : चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीसाठी दुबईत १ लाख लोकांची तिकिटासाठी झुंबड
चॅम्पियन्स ट्रॉफी ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते, मात्र या स्पर्धेत विश्वचषकाइतके संघ खेळत नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल ८ संघ सहभागी होतात. (Champions Trophy)

याशिवाय इतर संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जात नाही. या स्पर्धेची सुरुवात गट टप्प्यातील सामन्यांनी होते. यानंतर बाद फेरीचे सामने खेळवले जातात. तसेच, एकदिवसीय क्रमवारीतील टॉप-८ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटांचे संघ आपापल्या गटातील संघांशी एकदा खेळतात, त्यानंतर दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत पोहोचतात. (Champions Trophy)