Vasaicha Raja : ‘वसईचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या नैवेद्य स्पर्धा आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठाणाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

236
वसई येथील सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ म्हणून ‘वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाची (Vasaicha Raja) ओळख आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान मंडळाकडून हिंदू परंपरा, संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल असे कार्यक्रम राबवले जातात. त्याला मोठ्या संख्यने हिंदूंचा प्रतिसाद मिळत असतो. यंदाच्या वर्षी नैवेद्य स्पर्धा आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित केले होते. त्यालाही उत्सुर्फपणे प्रतिसाद मिळाला.

नैवेद्य स्पर्धा अनोखा उपक्रम 

14 सप्टेंबर 2024 रोजी ‘वसईचा राजा गणेशोत्सव मंडळा’च्या (Vasaicha Raja) वतीने नैवेद्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 25 महिलांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रथम पारितोषिक प्रांजल प्रशांत पोतदार, द्वितीय पारितोषिक कुमारी चिन्मया तांडेल आणि तृतीय पारितोषिक रुक्मिणी सिंगर यांना मिळाले. विजेत्यांना बक्षिसे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस रंजना चौधरी, माधुरी जाधव, गया गवळी, रविना जगताप, हेमांगी वर्तक, भारती पुरोहित याना देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला उपस्थित सर्व स्पर्धकांना भेटवस्तु देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले.

सामूहिक अथर्वशीर्ष पठण 

14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शंभरहुन अधिक महिला भगिनींनी सहभाग घेऊन ओम नमस्ते गणपती हे…असे अथर्वशीर्षाचे पठण करून वसईचा राजा (Vasaicha Raja) चरणी आपली अनोखी भक्ती अर्पण केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.