“सरन्यायाधीश निवृत्त, त्यामुळे जनतेच्या…”, शिवसेना पक्षाबद्दल बोलताना Uddhav thackeray नेमकं काय म्हणाले?

171
"सरन्यायाधीश निवृत्त, त्यामुळे जनतेच्या...", शिवसेना पक्षाबद्दल बोलताना Uddhav thackeray नेमकं काय म्हणाले?

राज्यात विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. त्यात दोन दिवस आधीच प्रचार संपणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांची जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जनतेकडे न्यायाच्या मागणी केली.

(हेही वाचा-Assembly Election : महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव पाडण्याचा माओवादी संघटनेचा कट?)

शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या सुनावणीवर बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) म्हणाले, “आपल्याला सुप्रीम कोर्टाकडून अद्याप न्याय मिळाला नाही. ज्यांच्यासमोर सुनावणी झाली ते सरन्यायाधीश निवृत्त झाले. पण न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता आपण जनतेच्या न्यायालयापुढे जाणार. निकाल कधी मिळणार आहे की नाही? लोकशाही अखेरची घटका मोजत आहे. तिला वाचवणारं कुणी आहे की नाही? सगळीकडे फक्त तारीख पे तारीखच कार्यक्रम चालू आहे. आम्हाला न्याय मिळतो की नाही? मधल्या काळामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. ही सगळी थट्टा तुम्ही कशासाठी करत आहात?”

(हेही वाचा-Congress-UBT Tussle : रामटेक बंडखोरीमागे काँग्रेस नेत्याचा ‘हात’: शिवसेना उबाठा)

“सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेबांनी तुमच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय का मिळत नाही? जे संविधनाप्रमाणे आहे ते मिळालं पाहिजे. 3 सरन्यायाधीश झाले तरीदेखील लोकशाहीला अजून न्याय नाही मिळत नाही. आमचं सगळ्यात महत्त्वाचं न्यायालय म्हणजे जनता आहे आणि जनता न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. माझा पक्ष आणि चिन्ह पळवलं. भाडखाऊ पेक्षा जास्त शब्द असेल तर तो वापरा. जर कोणी माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणत असेल तर तो बेअकली आहे.” (Uddhav thackeray)

(हेही वाचा-Assembly Election : सिंधुदुर्गात दीपक केसरकर, नितेश राणे, निलेश राणे, वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला)

“पक्ष चोरला, चिन्हं चोरलं. भाडखाउ पेक्षा जास्त वेगळा शब्द वापरायला पाहिजे. मिंध्याना स्वतःच्या बापाचं नाव वापरायला लाज वाटते. मी काढलेला फोटो तुम्ही चोरला. हमखास पराभवाची गॅरंटी म्हणजे यांची गॅरंटी. औरंगाबादचं संभाजीनगर कोणी केलं? आपण केले. हे गद्दार ढोकळा खायला पळाले होते. विमानतळाचे नाव संभाजीनगर का नाही केलं? माझ्यावर टीका करण्याआधी तुमच्या बुडाखाली काय काय पेंडिंग आहे ते आधी बघा.” असं उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) म्हणाले होते.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.