“..तर शांत झोप लागेल, हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही” PM Narendra Modi यांचा उद्धव ठाकरेंना टोला

152
“..तर शांत झोप लागेल, हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही” पंतप्रधान Narendra Modi यांचा उद्धव ठाकरेंना टोला
“..तर शांत झोप लागेल, हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही” पंतप्रधान Narendra Modi यांचा उद्धव ठाकरेंना टोला

“काँग्रेसच्या शहेजाद्याच्या तोंडून एकदा तरी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ हे वदवून दाखवा. ज्या दिवशी तुम्ही हे करून दाखवाल, त्या दिवशी बघा कशी शांत झोप लागते. कधी हॉस्पिटलला जाण्याची गरज भासणार नाही,” असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हाणला.

गुरुवारी १४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरील महायुतीच्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) बोलत होते. आपल्या ३५ मिनिटाच्या भाषणात मोदी यांनी भाजपाशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला हाणला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील महायुतीचे सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

(हेही वाचा – Elon Musk ‘या’ योजनेमुळे अमेरिकेचे 170 लाख कोटी वाचवणार; कसे ते जाणून घ्या..)

वीर सावरकर यांना शिव्या घालणाऱ्यांच्या गळ्यात गळे

मोदी पुढे म्हणाले, “मुंबई बाळासाहेब ठाकरे यांचे सिद्धांत पाळणारे, स्वाभिमानी शहर आहे. पण आघाडीत एक असा पक्ष आहे ज्यानी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रीमोट कंट्रोल दिला आहे. आणि म्हणून त्यांना एक आव्हान दिले होते, की काँग्रेसच्या शहेजाद्याकडून बाळासाहेबांची प्रशंसा करणारे काही वाक्य वदवून दाखवा. बाळसाहेबांचे आशीर्वाद मिळतील. पण हे लोक अद्याप बाळसाहेबांची प्रशंसा करणारे काहीही वदवून घेऊ शकले नाहीत आणि हीच आघाडीवाल्यांची सच्चाई आहे. वीर सावरकर यांना शिव्या घालणाऱ्यांच्याही गळ्यात गळे घालून फिरतात,” अशी खरमरीत टीका मोदी यांनी ठाकरे आणि काँग्रेसवर केली.

.. तर मोदी पाताळातही सोडणार नाही

“कधीकाळी मुंबईत अतिरेकी कारवायांची भीती होती, ट्रेन, बसमध्ये लोक घाबरलेले असायचे. घरी सुखरूप पोहोचू की नाही, याची शाश्वती नव्हती. पण गेल्या काही वर्षात सुरक्षितता वाटू लागली आहे. आजही तेच पोलिस, तीच सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे, याच फायली होत्या त्याच आहेत, पण तेव्हा सरकार वेगळे होते आज मोदी आहे. आता ती भीती गेली. अतिरेक्यांच्या म्होरकयांना माहीत आहे की मुंबई किंवा भारताविरुद्ध काही अतिरेकी कारवाया केल्या, तर मोदी पाताळातही सोडणार नाही,” असे बोलताच लोकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

(हेही वाचा – बंद सम्राटाला कायमचे बंद करा; CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात)

महाराष्ट्रातील महिला उद्योग क्षेत्रातही पुढे आहे. अन्य राज्यात मुंबईच्या महिलांचे उदाहरण दिले जाते. २७,००० पेक्षा जास्त स्टार्ट अपचे नेतृत्व महिला करत आहेत. देशातील महिलांना दिशा दाखवण्याचे काम मुंबईतील महिला करत आहेत, असे मोदी म्हणाले. मोदी यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना सांगितले की, मोदी सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांच्या पोटात दुखायला लागले.

शपथविधीचे निमंत्रण

“महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करताना, “ही प्रचार सभा नाही तर मी १० दिवसांनी लागणाऱ्या निकालानंतर जो महायुतीचा शपथविधी होणार आहे त्याचे निमंत्रण देण्यासाठी आलो आहे, असे समजा,” असे मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच “तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मला महायुतीची साथ हवी आहे, मला महायुतीचे सरकार हवे आहे. जेणेकरून मी कुठल्याही अडथळ्यांशीवाय तुमची कामे करू शकेन. आणि यासाठी मला आशीर्वाद द्या..” असे आवाहनही मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.