Maharashtra Vidhansabha Election 2024: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजित पवारांच्या आमदारावर गुन्हा दाखल!

106
Maharashtra Vidhansabha Election 2024: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजित पवारांच्या आमदारावर गुन्हा दाखल!
Maharashtra Vidhansabha Election 2024: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजित पवारांच्या आमदारावर गुन्हा दाखल!

राज्यात विधानसभा निवडणुकींचा (Maharashtra Vidhansabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. त्यात दोन दिवस आधीच प्रचार संपणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात रात्री दहानंतर प्रचार सुरु ठेवल्याने मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आणि नामदेव दाभाडे (Namdev Dabhade) यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे जिल्हा विधानसभा विश्लेषण : ठाण्याचा गड युती कसा राखणार?)

शिरगाव पोलिस ठाण्यात निवडणुक विभागाचे कर्मचारी दिपक भाऊराव राक्षे (वय-५३,रा. साेमटणे फाटा,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आमदार सुनील शेळके (वय–४५) व नामदेव दाभाडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा-Assembly Election 2024 : ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ मतदानासाठी विशेष अभियान )

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार रात्री दहा वाजता प्रचार उमेदवारांनी थांबवणे बंधनकारक आहे. परंतु सुनील शेळके यांनी त्यांच्या दौऱ्यात रात्री दहा नंतर देखील प्रचार सुरु ठेवला. शिरगाव पोलिस ठाण्याचे हद्दीत आढले खुर्द व चांदखेड या गावात रात्री दहा वाजल्यानंतर प्रचारास बंदी असताना देखील रात्री पावणेबारा वाजेपर्यंत प्रचार फेरी सुरु होती. तसेच फटाके देखील वाजविण्यात आले. त्यामुळे निवडणुक आयाेगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले. आयोजक नामदेव दाभाडे यांनी देखील प्रचारात साथ दिली. त्यामुळे सदर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.