Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संजय राऊत आणि नाना पटोलेंचे सूर काही जुळेना! नव्या वादाची ठिणगी

89
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संजय राऊत आणि नाना पटोलेंचे सूर काही जुळेना! नव्या वादाची ठिणगी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संजय राऊत आणि नाना पटोलेंचे सूर काही जुळेना! नव्या वादाची ठिणगी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असताना मविआतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. आतापर्यंत काँग्रेसने ९९ ते १०० उमेदवार जाहीर केले आहेत. तर, ठाकरे गटाने ८४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये दक्षिण सोलापूरमधून दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादातून आता पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्या ठिणगी पडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी संजय राऊतांना प्रेमाचा सल्लाही दिला आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

…ही टायपिंग मिस्टेक
उबाठा गटाने दक्षिण सोलापूरमधुन अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. २४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्मही दिला. परंतु, काँग्रेसने काल (२७ ऑक्टोबर) जाहीर केलेल्या यादीत दक्षिण सोलापूरमधून दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली. यावर संजय राऊत म्हणाले, “आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत. सोलापूर दक्षिण या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. काँग्रेसच्या यादीतही काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. आता मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात.” तसेच, नागपूरमध्ये उबाठा गटाला फक्त एकच जागा देण्यात आली आहे. यावरूनही संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

…असा प्रेमाचा सल्ला आहे

टायपिंग मिस्टेकच्या विधानावरुन नाना पटोले यांनी राऊतांना चांगलच फटकारलं आहे. नाना पटोले म्हणाले, “कोकणात आम्हालाही जागा मिळाली नाही. संजय राऊतांनी हा विषय संपवला पाहिजे. विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. आमच्या हायकमांडने निर्णय घेतला आहे. त्यांच्या पातळीवर सोलापूरबाबत चर्चा होईल. असं वाटतं. राज्य म्हणून आम्ही त्यात प्रतिक्रिया देणार नाही. मला असं वाटतं की, संजय राऊतांनी आपली भूमिका विरोधकांच्या विरोधात टाकली पाहिजे असा प्रेमाचा सल्ला आहे.” असं ते म्हणाले. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.