दिल्ली, मुंबई, जयपूरसह ५ शहरांमध्ये EDची छापेमारी; कोल्डप्ले आणि दिलजीतचा कॉन्सर्ट EDच्या रडारवर

75
दिल्ली, मुंबई, जयपूरसह ५ शहरांमध्ये EDची छापेमारी; कोल्डप्ले आणि दिलजीतचा कॉन्सर्ट EDच्या रडारवर
दिल्ली, मुंबई, जयपूरसह ५ शहरांमध्ये EDची छापेमारी; कोल्डप्ले आणि दिलजीतचा कॉन्सर्ट EDच्या रडारवर

पंजाबी पॉप गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्ले (Coldplay) यांच्या आगामी कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) शनिवारी 5 राज्यांतील 13 ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणी तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला आहे. 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल स्टेडियमवर गायक दिलजीतचा कॉन्सर्ट होणार आहे. तर कोल्डप्ले कॉन्सर्ट नवी मुंबईत जानेवारी २०२५ मध्ये होणार आहे. (ED)

(हेही वाचा-‘बटेंगे तो कटेंगे’ यावर काय म्हणाले RSS चे सहकार्यवाह होसबळे?)

ईडीने सांगितले की, गेल्या शुक्रवारी रात्रीपासून दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक आणि पंजाबमधील 13 ठिकाणी शोध घेण्यात आला. या तपासानंतर एजन्सीने मनी लाँडरिंग कायद्याच्या विविध कलमांखाली फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. ईडीने छापेमारीत मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सिमकार्ड जप्त केले आहे. (ED)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Poll : दिंडोशीत शिवसेना विरुद्ध शिवसेना!)

ब्रिटिश म्युझिकल बँड कोल्ड प्लेचा इंडिया कॉन्सर्ट जानेवारी 2025 मध्ये होणार आहे. 22 सप्टेंबरला तिची ऑनलाइन तिकीट खिडकी उघडताच काही मिनिटांतच सर्व तिकिटे विकली गेली. बुक माय शो ही तिकीट विक्री साइट क्रॅश झाली होती. अशा बेकायदेशीर कृत्यांमधून किती कमाई होत आहे हे शोधण्यात तपास यंत्रणा व्यस्त आहे. साधारणपणे, अशा कॉन्सर्टची तिकिटे Zomato, Book My Show आणि इतर ॲप्स आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात. (ED)

(हेही वाचा-Maharashtra Election Assembly 2024 : मनसेची पाचवी यादी जाहीर; ‘आमित देशमुख’ ही उमेदवारी यादीत!)

मात्र, जेव्हा मैफलीची मागणी खूप असते तेव्हा ही तिकिटे लवकर विकली जातात आणि मग काळाबाजार करणाऱ्यांचे काम सुरू होते. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घेण्यामध्ये ईडी देखील व्यस्त आहे. (ED)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.