Dindoshi Assembly : दिंडोशीत पिण्याच्या पाण्याची समस्या का, शिवसेना उमेदवार निरुपम यांनी केला कुणावर आरोप

102
Dindoshi Assembly : दिंडोशीत पिण्याच्या पाण्याची समस्या का, शिवसेना उमेदवार निरुपम यांनी केला कुणावर आरोप
Dindoshi Assembly : दिंडोशीत पिण्याच्या पाण्याची समस्या का, शिवसेना उमेदवार निरुपम यांनी केला कुणावर आरोप
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

दिंडोशीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथे १५ -१५ दिवसांनी पाण्याचा पुरवठा होत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठ्यातील इथे दोन तृतीयांश पाणी हे बिल्डर लॉबीला पुरवले जात आहे. यासाठी आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचा दबाव असल्याचे महापालिकेच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे, असा आरोप दिंडोशी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केले. (Dindoshi Assembly)

उबाठा मालाड येथील शिवसेना मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना शिवसेनेचे दिंडोशी मतदार संघाचे उमेदवार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी, दिंडोशीतील नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. इथल्या लोकांचे हक्काचे पाणी बिल्डर लॉबीकडे वळवले असून यासाठी इथले उबाठाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप केला. दिंडोशीकरांऐवजी बिल्डर लॉबीचे भले करणारे प्रभू बिल्डरांचे दलाल असल्याचा पुनरुच्चार निरुपम यांनी केला. (Dindoshi Assembly)

(हेही वाचा – Arjun Tendulkar रणजी सामन्यात चमकला)

सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्त्रोत कमिशन असल्याचा उल्लेख केला आहे. २०१९ मधील प्रतिज्ञापत्रात त्यांनी कमिशन आणि वेतन असे उत्पन्नाचे स्त्रोत दाखवले होते. २०१४ मध्येही त्यांनी कमिशन हाच उत्पन्नाचा स्त्रोत दाखवला होता. सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांना झोपडपट्टीतील जनता कमिशन नाही देणार असा सवाल निरुपम यांनी केला. याचा अर्थ ते बिल्डरांकडून कमिशन घेतात हे स्पष्ट आहे, त्यामुळे सुनील प्रभू (Sunil Prabhu) हे निवडणुकीत उमेदवारी मागे घेऊन राजकारणातून संन्यास घेणार का, असे आव्हान निरुपम यांनी यावेळी पुन्हा एकदा दिले. (Dindoshi Assembly)

आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्या आशिर्वादाने मागील १० वर्षांपासून येथील झोपडपट्टीवासीयांची बिल्डरांकडून लूट केली जात असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. येथील पाणी माफिया, वीज माफियांची चौकशी करुन वन जमिनींवरील नागरिकांना महापालिकेने मुलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केली. (Dindoshi Assembly)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.